COVID-19 Maharashtra: राज्यात 24,752 नवीन रुग्ण; 453 रुग्णांचा मृत्यू 
corona update 1.

COVID-19 Maharashtra: राज्यात 24,752 नवीन रुग्ण; 453 रुग्णांचा मृत्यू 

देशात कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मागच्या 20 दिवसात काही लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव रुग्ण कमी झाले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील मागच्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात 65 हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते. परंतु, आता तो आकडा 30 हजाराच्या आसपास येऊन थांबला आहे. महाराष्ट्रामध्ये लागू असलेल्या कडक लॉकडाऊनचा कोरोनाची आकडेवारी कमी करण्यास मदत होत आहे.  कमी होणारी रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकार 1 जूननंतर निर्बंध शिथिल करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.(24,752 new patients in the state; Deaths of 453 patients) 

मागच्या 24 तासात राज्यात  24,752 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर, 23,065 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 56,50,907 रुग्ण आढळले असून 52,41,833 रुग्णांनी कोरोनावरती यशस्वी मात केली आहे. मागच्या 24 तासात राज्यात 453 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत देशात  91,341 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 3,15,042 अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. 3,38,24,959 नागरिकांची आतापर्यंत कोरोनाची चाचणी करण्यात आलेली आहे.

हे देखील पाहा

दरम्यान, राज्यात कोरोनानंतर म्युकरमायकोसीस आजाराने डोके वर काढले आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) म्युकरमायकोसीसच्या आजारावर मोफत उपचार केले जातील असे सांगितले होते. याचाच आधार घेऊन काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर ठीक केली होती.

Edited By : Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com