सांगली शासकीय कोरोना रुग्णालयातील 31 डॉक्टरांची तडका-फडकी सातारा येथे बदली

सांगली शासकीय कोरोना रुग्णालयातील 31 डॉक्टरांची तडका-फडकी सातारा येथे बदली
31 doctors from Government Corona Hospital transferred to Satara

सांगली : मिरजेच्या Miraj शासकीय कोरोना रुग्णालयातील Government Corona Hospital 31 डॉक्टरांची तडका-फडकी सातारा या ठिकाणी बदली करण्यात आलेली आहे. डॉक्टरांना Doctor तातडीने सातारा या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांकडून देण्यात आले आहेत. या डॉक्टरांच्या बदलीमुळे कोरोना रुग्णालयातल्या उपचार सेवेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 31 doctors from Government Corona Hospital transferred to Satara

हे देखील पहा -

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न शासकीय कोरोना रुग्णालय याठिकाणी सेवा बजावणाऱ्या 31 प्राध्यापक-डॉक्टरांची बदली करण्यात आलेली आहे. सातारा Satara या ठिकाणी नव्याने होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची बदली करण्यात आलेली आहे. सर्व 31 डॉक्टरांना तात्काळ सातारा या ठिकाणी त्वरित सेवेत रुजू होण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आलेल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून Department of Medical Education and Research हे आदेश काढण्यात आलेले आहेत. 

हे 31 डॉक्टर मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयात उपचार सेवा देत आहेत. त्यामुळे या डॉक्टरांच्या बदलीमुळे कोरोना रुग्णालयातल्या उपचार सेवेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com