कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या 49 गायांची सुटका
beed 3

कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या 49 गायांची सुटका

बीड: आयशर टेम्पोसह पीकअपमधून कत्तलखाण्याकडे गाई घेऊन जातांना, तीन वाहनांना बीड पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पकडले आहे. यामध्ये गाईसह वासरे असे तब्बल 49 जनावरे आढळून आले आहेत. विशेष पथकाचे प्रमुख विलास हजारेंना गाई कत्तलखाण्याकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे त्यांनी मांजरसुंबा चौकात सापळा लावला होता. यादरम्यान आज पहाटे आष्टी तालुक्यातील खडकत येथून गायी व वासरे बीडमधील कत्तल खाण्यात दोन पिकअप व आयशरमधून घेऊन निघालेल्या तीन वाहनांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. (49 cows taken for slaughter have been released)

हे देखील पाहा

त्यामध्ये गायी, वासरे असे एकूण 49 जनावरे आढळून आली आहेत. यावेळी चालकाच्या सीटखाली देखील लहान वासरांना कोंबून ठेवण्यात आले होते. त्या सर्व मुक्या जनावरांची सुटका करून त्यांना चौसाळा येथील महावीर गोशाळेत सोडण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईत 19 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात 9 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (49 cows taken for slaughter have been released)

Edited By: Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com