मावळमध्ये ६ दिवसांचा कडक लॉकडाउन

मावळमध्ये ६ दिवसांचा कडक लॉकडाउन
lockdown

पुणे : पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या लोणावळ्यात Lonavla ६ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामध्ये मावळ तालुक्याचा ही  समावेश करण्यात आला आहे. यादरम्यान तळेगाव Talegaon, वडगाव, कामशेत या ठिकाणी सुद्धा कडकडीत बंद राहणार आहे. 6 days strict lock down in Maval  

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद राहणार आहेत. जीवनावश्यक वस्तू केवळ घरपोच करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलीस Police चेक नाक्यावर कोरोना तपासणीची अग्निपरीक्षा देऊन पुढे जावं लागणार आहे. परंतु, या तपासणी मध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे.

हे देखील पहा -

अनेक नागरिकाचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह Positive आले आहेत. पोलिसांच्या चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी अशी माहिती दिली आहे. हा लॉकडाउन यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय यंत्रणांना व पोलीस स्टेशन प्रमुख यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. 6 days strict lock down in Maval

मावळ Maval तालुक्यातील लोकप्रतिनिधी, समाजसेवी संघटना व नागरिकांनी देखील या काळात नियमांचे पालन करावेत आणि यंत्रणेला सहकार्य करावे. जेणेकरून सर्वांच्या सहकार्याने कोविडचा वाढता प्रादुर्भाव आपल्याला रोखणे शक्य होईल, असे आवाहनही उपविभागीय अधिकारी जाधव यांनी केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com