एच आर सिटी स्कोर २१ ! तरी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आजीची कोरोनावर मात

एच आर सिटी स्कोर २१ ! तरी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आजीची कोरोनावर मात
65 year old grandmother overcome Corona in Osmanabad

उस्मानाबाद: ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे अनेक रुग्ण कोरोनामुळे Corona  दगावले आहेत. पण एच आर सिटी HRCT स्कोर २१ असतानासुद्धा वयाच्या ६५ व्या वर्षी बालिका यादव या महिलेनं शेतात राहून कोरोनावर मात केली आहे. 65 year old grandmother overcome Corona in Osmanabad

स्वतः शेती करणाऱ्या बालिका यादव यांना कधी कोणता आजार ना शिवला, ना कधी त्यांनी दवाखाना पाहिला.. पण कोरोनाने मात्र त्यांना वयाच्या ६५ व्या वर्षी गाठले. त्यांना सर्दी,खोकल्याचा त्रास सुरु झाला होता. त्यात त्यांचा एच आर सिटी स्कोर २१ आला होता. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता, उपचारासाठी त्यात ऑक्सिजन बेड कुठेही मिळाला नाही. शेवटी सैन्यसेवेत असणारा मुलगा रामहरी याने आपल्या आईला शेतात ठेऊन त्यांच्यावरती उपचार करण्याचं ठरवलं. रोज नियमित योगा, सकस आहार आणि डॉक्टरच्या औषधांच्या जोरावर बालिका यादव यांनी कोरोनाला चारीमुंड्या चित केलं.

बालिका यादव यांच्या या कोरोनाच्या लढाईत त्यांना त्यांचे सुपुत्र रामहरी यादव यांची मोलाची साथ मिळाली. भारतीय सैन्यात कार्यरत असणारे रामहरी यादव हे सुट्टी घेऊन गावाकडे आले होते, त्यात त्यांच्या आईला कोरोनाने गाठलं. पण केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आईने कोरोनावर मात केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

हे देखील पहा-

सध्या उस्मानाबाद Osmanabad मधील हसेगाव केज हे गावदेखील या कोरोनाच्या रुग्णवाढीमुळे त्रस्त आहे. मात्र बालिका यादव यांनी ज्यापद्धतीने कोरोनाला हरवलं, त्याची चर्चा संबंध पंचकृषीत होताना दिसत आहे. त्यामुळे बालिका यादव यांच्याप्रमाणे गावातील गावकरी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे रुग्णांवर उपचार करताना दिसत आहेत.

इच्छाशक्ती प्रबळ असली की मार्ग निघतो हे या ६५ वर्षीय बालिका यादव यांनी कोरोनाशी लढा देऊन सिद्ध केलं आहे. या मायलेकांची कोरोनाविरुद्धची लढाई नक्कीच सर्वांना प्रेरणा देणारी आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com