मुंबईमधील विविध भागांतून गॅस गळतीच्या तक्रारी

मुंबईमधील विविध भागांतून गॅस गळतीच्या तक्रारी

मुंबई:  मुंबईच्या पूर्व उपनगरातील विविध भागात गॅसची दुर्गंधी येत असल्याची शंका बऱ्याच स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर उपस्थित केली. काही रहिवाशांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना संपर्कही साधला. या तक्रारींची दखल घेत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत मुंबई महापालिकेने इतर केमिकल कंपन्यांना सतर्कतेचा इशारा दिला. 'देवनार, मानखुर्द, चेंबूर, विक्रोळी, दिंडोशी, विले पार्ले, कांदिवली, दहिसर भागात सध्या अग्निशमन दलाच्या ९ गाड्या रवाना झाल्या असून गॅस गळती नेमकी कुठे झाली आहे याचा तपास सुरू आहे' अशी माहिती महापालिकेने दिली. 

राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या चेंबूर प्लांटमध्ये गॅस गळती झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता, मात्र महापालिकेने या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे ट्विट करत स्पष्ट केलं आहे. 'राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या चेंबूर प्लांटमध्ये गॅस गळती झाल्याची माहिती आम्हाला सुरुवातीला मिळाली होती, मात्र 'आरसीएफ'मध्ये गॅस गळती झालेली नाही.'
'चेंबूर, कुर्ला ,मानखुर्दमधून गॅसचा वास येतोय इतकीच माहिती आमच्याकडे आतापर्यंत हाती आली आहे' असं राज्य पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून सांगण्यात आलं आहे. 

दुसरीकडे, या गॅस गळतीबाबत महानगर गॅस लिमिटेड यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, 'आम्हाला गॅस गळतीच्या तक्रारींचे अनेक फोन रात्री यायला लागले. आमची आपत्कालीन टीम याबाबत अधिक माहिती मिळवत आहे. ज्या भागांतून तक्रारींचे फोन आले त्या सर्व भागात आमच्या टीम सक्रिय झाल्या असून अद्याप आमच्या कोणत्याही पाईप लाईनमध्ये गळती असल्याचे निष्पन्न झाले नाही.'

मुंबईच्या पूर्व उपनगरात तसेच पश्चिम उपनगरात काही ठिकाणी गुरुवारी रात्री उशिरा गॅसची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने प्रचंड घबराट पसरली. मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा विविध भागातून स्थानिक नागरिक अग्निशमन विभागाकडे तक्रारीसाठी संपर्क साधत आहेत. या तक्रारींची दखल घेत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. गॅस गळती नेमकी कुठे झाली याचा शोध अद्याप लागलेला नसून नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे.


WebTittle:: MGL has been receiving complaints of gas smell from various parts of Mumbai
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com