राज ठाकरे यांचा प्रचार येत्या 9 तारखेपासून सुरु

 राज ठाकरे यांचा प्रचार येत्या 9 तारखेपासून सुरु


मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या नऊ तारखेपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात करणार आहेत. ठाण्यात पक्षाची पहिली प्रचार सभा होईल. 
पहिल्या सभेसाठी मुहूर्त मनसेने आपला लकी नंबर नऊ निवडला आहे. राज नऊ हा अंक लकी मानतात. त्यामुळे मनसेचे महत्त्वाचे निर्णय, शुभारंभ या नंबरभोवती फिरताना दिसतात. राज ठाकरे किंवा मनसेचा नऊ नंबरवर दृढ विश्वास असल्याची अनेक उदाहरणे आहेत. शिवसेना सोडण्यापासून ते मनसेच्या घोषणेपर्यंत, गाडीच्या नंबरपासून ते विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यापर्यंत सर्वत्र नऊ हाच नंबर दिसतो. उमेदवार निवड, उमेदवारांची संख्या या सर्वांशी या अंकाचा मेळ घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. 

मनसेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली ती 27 उमेदवारांची. त्यामुळे 2+7 =9 इथेही नऊचे गणित जुळून येते. दुसरी उमेदवार यादी 45 उमेदवारांची आहे, नऊ तारखेला ठाण्यातून प्रचाराला सुरवात, असा सर्व या अंकाशी मेळ घातल्याचे दिसून येते. 


Web Title: Raj Thackeray will start his Election Campaign from 9th October
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com