36 जिल्ह्यांच्या गावागावातील घडामोडी एका क्लिकवर..

36 जिल्ह्यांच्या गावागावातील घडामोडी एका क्लिकवर..

मुंबई - राज्यात 3 टक्क्यांनी घसरला मतदानाचा टक्का... सरासरी 60.46% मतदानाची नोंद... गुरुवारी लागणार विधानसभेचा निकाल...

मुंबई - भाजप-सेनेलाच पुन्हा मतदारांची पसंती.. महायुती गाठणार दोनशे पारचा टप्पा... एक्झिट पोलचा अंदाज...

चंद्रपूर - मतदानानंतर गाडीच्या सीटवर आढळले 3 ईव्हीएम.. दुर्गापूर परिसरातील खळबळजनक घटना... रिझर्व्ह मशिन असल्याचा प्रशासनाचा दावा..

औरंगाबाद - MIM खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी उमेदवार कदिर मौलाना भिडले... कटकट गेट परिसरात समर्थकांचा राडा... 20 ते 25 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल..

औरंगाबाद - भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानात तोडफोड.. अपक्ष राजू शिंदेंनी हल्ला करवल्याचा आरोप... घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद...

कोल्हापूर - कागलमध्ये हसन मुश्रीफ कार्यकर्त्यांचा निकालापूर्वीच विजयी जल्लोष... उदयनराजे स्टाईल कॉलर उडवत मुश्रीफांनी वाढवला कार्यकर्त्यांचा उत्साह...

बीड - बोगस मतदानावरुन क्षीरसागर काका-पुतण्यांच्या समर्थकांचा राडा...  संदीप क्षीरसागरांची मध्यस्थी...  काका-पुतण्याच्या राजकीय वादाचे पडसाद..

बुलडाणा - उत्साही कार्यकर्त्यांचा मतदान करताना व्हिडीओ व्हायरल.. निवडणूक अधिकारी उगारणार कारवाईचा बडगा..

खडकवासला - उमेदवार सचिन दोडकेंच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधी लावले विजयी पोस्टर्स...  आतषबाजीसह दोडकेंची काढली मिरवणूक..

मुंबई - विलेपार्लेत निवडणूक साहित्याबाबत विरोधकांची तक्रार.. गैरपद्धतीने निवडणूक साहित्य नेल्याचा आरोप... काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेची आयोगाकडे तक्रार...

मुंबई - राज्यभरात ईव्हीएम बंद पडल्याच्या काँग्रेसने केल्या 195 तक्रारी... तर बिघडलेले EVM तात्काळ बदल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण...

ठाणे - बसपा कार्यकर्त्याने ईव्हीएमवर फेकली शाई... ईव्हीएम पद्धत बंद करण्याची मागणी.. पोलिसांनी सुनील खांबेला घेतलं ताब्यात..

मुंबई - उद्यापर्यंत मुंबईत परतीच्या पावसाचा मुक्काम... हवामान खात्यानं वर्तवला अंदाज... अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचे क्षेत्र..

पुणे - शहरात रात्रभर पावसाची तुफान बॅटिंग.. रस्ते झाले जलमय.. कात्रज, नवीन वसाहतीत पाण्याचा जोरदार प्रवाह...

अहमदनगर - मुळा धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस.. धरणाचे 11 दरवाजे उघडले..

सोलापूर - दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप... निरा आणि भीमा नदी दुथडी भरून वाहू लागल्या... धरणातून वाढवला विसर्ग... नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...

उस्मानाबाद - परतीच्या पावसामुळे नळदुर्ग किल्ल्यातील प्रेक्षणीय नर-मादी धबधबा प्रवाहित.. बोरी धरणही पूर्ण क्षमतेने भरलं...

परभणी - परतीच्या पावसाने पाणीटंचाईचं संकट गेलं दूर... शहरावर पसरली धुक्याची चादर... पावसामुळे कापूस, सोयाबीनचे नुकसान..

सांगली - मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 12 पूल पाण्याखाली... कृष्णा नदीची पातळी वाढली... सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांचे स्थलांतर..

सातारा - दोन दिवस मुसळधार पावसाने आंधळी धरणाच्या पाणी पातळीत वाढ... माणगंगा नदीला पूर, बंधारे गेले पाण्याखाली...

सिंधुदुर्ग - परतीच्या पावसाने भातशेतीचं नुकसान... फोंडा, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ल्यात जोरदार पाऊस...

वाशिम - रिमझिम पावसानंतर जिल्ह्यात सर्वदूर धुक्याची चादर... धुक्यामुळं भाजीपाल्यासह तूर पिकाला फटका बसण्याची शक्यता..

यवतमाळ - सरकारच्या 13 कोटी वृक्ष लागवडीचं भयाण वास्तव... मानकी ग्राम पंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर.. शेकडो रोपटी फेकली नाल्यात..

मुंबई - सरकारी बँकांच्या दोन संघटनांची आजपासून देशव्यापी संपाची हाक... उर्वरित 7 संघटनांचा मात्र संपाला पाठिंबा नाही.. कामकाजावर परिणाम होणार नसल्याचं स्पष्टीकरण..

मुंबई - PMC बँक घोटाळ्यानंतर 5व्या खातेदाराचा बळी... हृद्यविकाराच्या झटक्याने भारती सदारंगानी यांचा मृत्यू..

बुलडाणा - माजी सैनिकाची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या... आत्महत्येचं कारण अस्पष्ट.. खामगाव तालुक्यातल्या आंबेटाकळीतील घटना..

मुंबई - लिफ्ट आणि भिंतीच्या गॅपमध्ये अडकून महिलेचा मृत्यू... कफ परेडच्या विजया अपार्टमेंटमधील घटना.. आरती चोप्रा असं मृत महिलेचं नाव...

कोल्हापूर - हुबळी रेल्वे स्थानक स्फोटाचे कोल्हापूर कनेक्शन... महाराष्ट्र, कर्नाटकात हाय अलर्ट जारी... विशेष पोलिस दल कर्नाटकात दाखल..

लोणावळा - मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ट्रक-बसचा अपघात.. 3 प्रवाशांचा मृत्यू, 16 जखमी...

पुणे - सिंहगड रोडवर शिक्षा अकॅडमीच्या प्राध्यापकाला मारहाण.. विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्यामुळे पालकांच्या संतापाचा उद्रेक... 

मुंबई - मद्यधुंद टोळक्याला सहप्रवाशांनी दिला चोप... लोकलमध्ये दारु पिऊन करत होते दादागिरी...

मुंबई - प्रवासी संख्या वाढल्याने घाटकोपर-वर्सोवा मेट्रोचं भाडं कमी करा... मुंबईकरांची मेट्रो प्रशासनाकडे मागणी...

मुंबई - लवकरच BSNL लाँच करणार 4G सर्व्हिस... ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 2020 पर्यंत 4G सर्व्हिस पुरवणार...

मुंबई - अजय देवगणच्या 'तानाजीः द अनसंग वॉरिअर' चित्रपटाचं पोस्टर रिलीज... 10 जानेवारी 2020 ला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला...

मुंबई - हाऊसफुल 4 सिनेमाचं नवं गाणं प्रदर्शित... 26 ऑक्टोबरला सिनेमा होणार रिलीज...

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com