तुमच्या जिल्ह्यात आज काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

तुमच्या जिल्ह्यात आज काय घडलं? वाचा एका क्लिकवर!


राज्यातल्या जिल्ह्याजिल्ह्यात काय घडामोडी घडत आहेत, त्याचा सुपरफास्ट आढावा घेणार आहोत, पुढच्या दोन मिनिटांत.
चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठे काय घडतंय, चला पाहूयात..
--------------------------------------------------------------------
01 अकोला - परतीच्या पावसानं ज्वारी पिकाचं नुकसान, शेतकरी चिंतेत


02 अमरावती - बच्चू कडूंनी दिव्यांगांना अभ्यंगस्नान घालत साजरी केली दिवाळी


03 बारामती- पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यासाठी दाखल, शेकटो कार्यकर्त्यांची पवारांना भेटण्यासाठी लगबग, पोलिसांची दमछाक


04 बीड - धनंजय मुंडेंनी व्यापाऱ्यांची भेट घेत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा


05 मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांचा दिवाळी आनंदावर पाणी, बोनसविनाच साजरी करावी लागणार दिवाळी


06 मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवाकर रावतेंनी घेतली राज्यपालांची भेट, सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा


07 बुलडाणा - गोरगरिबांना तब्बल 5 क्विंटल फराळाचं वाटप


08 बुलडाणा - शेतात आढळला भलामोठा साप, शेतकऱ्यााचा पाय सापावर पडल्यानं समोर आला प्रकार


09 पुणे - मतदारांना थॅक्यू बोलण्यासाठी चंद्रकांत पाटील वाटणार 1 लाख साड्या


10 चंद्रपूर - प्रदूषित हवेमुळे वातावरण बिघडलं


11 खालापूर - एक्स्प्रेस वेवर टेम्पो आणि ट्रकच अपघात, दोघांचा मृत्यू, एक जण जखमी


12 जेजुरी - सोमवती अमावस्येनिमित्त खंडोबाच्या जयघोषणात पालखी सोहळा संपन्न


13 बार्शी - अपक्ष राजेंद्र राऊत यांचा भाजपला पाठिंबा 


14 मीरा-भाईंदर - अपक्ष गीत जैन यांचा भाजपला पाठिंबा


15 पंढरपूर - अमोल वाखरकर यांने म्हैसूर पॅलेसची हुबेहूब प्रतिकृती साकारली


16 परभणी - पावसातही दिवाळीचा उत्साह कायम, थाटामाटात दीपोत्सव साजरा


17 परभणी - पावसाने घराची भिंत कोसळली, बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू


18 पंढरपूर - पाडव्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचा गाभारा आकर्षक फुलांनी सजला


19 खेड-शिवापूर - पुणे-सातारा मार्गावर खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा, दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्यांचा मनस्ताप


20 अमरावती - युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा यांचा भाजपा पाठिंबा


21 सांगली - भीषण आगीमध्ये बेकरीचं मोठं नुकसान, आग आटोक्यात, जीवितहानी नाही


22 मुंबई - सायन स्टेशन परिसरात भंगाराच्या गोदामाला आग, आग नियंत्रणात, आगीचं कारण अस्पष्ट


23 सोलापूर - बनावट सोन्याची नाणी दाखवून ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या दाम्पत्यालची फसवणूक, 6 लाख रुपयांचा गंडा


24 सोलापूर - 36 पैकी 13 साखर कारखाने बंद, पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योग कडू झाल्याची चर्चा


25 वाशिम -शेतकऱ्यांकडून झेंडू फुलाची नासाडी, शेकडो क्विंटल झेंडूला भाव न मिळाल्याने शेतकरी नाराज 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com