...आणि आमदार भारत भालके कुस्तीच्या मैदानात पंच म्हणून उतरले!

...आणि आमदार भारत भालके कुस्तीच्या मैदानात पंच म्हणून उतरले!

मंगळवेढा :- कुस्तीच्या आखाड्यातील डावपेच राजकारणाच्या आखाड्यात  टाकून हॅटट्रिक प्राप्त केलेल्या आमदार भारत भालकेना कुस्तीचा मोह न आवरल्यामुळे त्यांनी कुस्तीच्या आखाड्यात पंचगिरी केली. त्यात दिलेले धडे कुस्तीगीराना महत्वपूर्ण ठरले.

तालुक्यातील बोराळे येथे जय हनुमान तालीम संघाच्या वतीने दरवर्षी दरवर्षी दीपावली पाडव्याच्या निमित्ताने कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या कुस्ती स्पर्धेसाठी भालके यांना उदघाटनासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते,विजय खवतोडे, रामचंद्र वाकडे  मारुती वाकडे ,सचिन नकाते,बाबासाहेब पाटील, मनोहर कवचाळे, अंकुश घोडके आदींसह येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी 50 रुपयापासून ते एक लाख रुपये पर्यंत बक्षिसे कुस्ती विजेत्यांना देण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धेत चर्चा झाली ते भालके यांच्या बालपणातील व राजकीय कुस्तीची. भालके यांना कुस्तीची लहानपणापासून आवड होती. कोल्हापूरच्या तालमीत यांनी कुस्तीचे धडे घेत कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी आखाडे देखील गाजवले. त्यानंतर सहकारी संस्थेच्या राजकारणात त्यांनी राजकीय प्रवेश केला आणि त्यातही ते यशस्वी झाले त्यानंतर 2009 स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आमदार झाल्यानंतर 2014 साली त्यांनी काँग्रेस मधून तर 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी केली. कुस्तीच्या आखाड्यातील डावपेच त्यांनी राजकीय आखाड्यात देखील वापरले गेल्यामुळे त्यांना त्यांना वेगवेगळ्या पक्षातून आमदारकी मिळाली.

त्यांच्या निवडणुकीतील प्रचारामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या कुस्तीचा देखील उल्लेख करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला होता. तुम्हाला सरळ डावात नाही, नुरा तर अजिबात नाही थेट घुटण्या डावात चितपट करून दाखवू, असा इशारा त्यांनी त्यावेळी दिल्यामुळे या राजकीय आखाड्यात कुस्तीची अधिक चर्चा झाली होती. बोराळेच्या कुस्ती स्पर्धेत भालकेंना तरुणपणातील कुस्तीचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे ते थेट पंचगिरी करत सहभागी झाले. सध्याच्या मोबाईल जमान्यामध्ये अनेक खेळ कालबाह्य होत असल्याने शरीरसंपदा टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com