कोणाचे आहेत राऊतांपेक्षा शरद पवारांशी अधिक जवळचे संबंध

कोणाचे आहेत राऊतांपेक्षा शरद पवारांशी अधिक जवळचे संबंध

मुंबई : फक्त शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी शिवजीपार्कवर होईल असा दावा संजय राऊत यांनी करू नये. शिवजीपार्कवर शपथविधी केवळ शिवसेनेचा नाही तर भाजपसह शिवसेना आरपीआय महायुती च्या मंत्र्यांचा शपथविधी झाला पाहिजे असे सांगत संजय राऊत यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे हा आग्रह सोडावा.

काँग्रेस राष्ट्रवादी च्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा दुराग्रह संजय राऊत यांनी सोडावा त्यांनी हे लक्ष्यात घ्यावे की त्यांच्या पेक्षा अधिक जवळचे संबंध माझे शरद पवारांशी आहेत.
त्यामुळे लवकरच मी शरद पवार यांची भेट घेणार आहे असे वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी त्यांच्या बांद्रा पूर्वेतील संविधान निवासस्थानी केले. 

शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडावा; शिवसेनेने  उपमुख्यमंत्री पद  आणि 16 मंत्रीपदांचा भाजपचा  प्रस्ताव स्वीकारावा; त्यात आणखी दोन मंत्रीपदे शिवसेनेला वाढवून द्यावीत यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगत ना रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना लवकर महायुतीच्या सरकारचा शपथविधी कसा होईल तशी भूमिका घेण्याचा सल्ला दिला. 

जनतेने भाजप शिवसेनेला बहुमताचा जनादेश दिला आहे.त्या विपरीत भूमिका शिवसेनेने घेऊ नये.शरद पवारांचा पाठिंबा फक्त संजय राऊत मिळवू शकतात असे नाही,माझे शरद पवारांशी अधिक जवळचे संबंध आहेत.भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असे सत्तवाटप करून महाराष्ट्राच्या हितासाठी लवकर सरकार स्थापन करावे ही माझी भूमिका आहे.पण वेळ पडल्यास आपण लवकर शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे वक्तव्य ना रामदास आठवले यांनी आज केले.

WebTitle : ramdas athavale to sanjay raut on sharad pawar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com