VIDEO |  संजय राऊतांचा भाजपवर अप्रत्यक्ष आरोप

VIDEO |  संजय राऊतांचा भाजपवर अप्रत्यक्ष आरोप


मुंबई : ''होय. माझं शरद पवारांशी बोलणं झालं. पवारांशी संपर्क करणं हा काय अपराध आहे का ? देशाचे नेते आहेत ते, त्यांचे ५४ आमदार निवडून आलेत, त्यांच्याशी का बोलू नये? त्यांच्याशी कोण कोण बोलतंय हे मला माहिती आहे. पवारांशी आम्ही बोलल्याचा पोटशूळ उठलाय, ते सुध्दा पवारांना फोन करायचा कुठं व कसा प्रयत्न करताहेत, हे काही आम्हाला माहिती नाही का?," असे सांगत भाजपही शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केला. 

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ''काल आम्ही महाराष्ट्राच्या परिस्थिती बाबात राज्यपालांशी बोललो.सर्व प्रश्नांवर चर्चा केली आम्ही आमची भुमिका मांडली. महाराष्ट्र राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे. सरकार लवकर स्थापन होईल. मुख्यमंत्री सेनेचा होईल. सर्व पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत. सर्वांची भूमिका आता महत्वाची आहे. महाराष्ट्रचा निर्णय हा महाराष्ट्रात होईल.'' 

''महाराष्ट्र मध्ये स्थिर सरकार यावे  हे पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना वाटते आहे. सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सुद्धा स्थिर सरकार हवं आहे. लवकरच शपथ ग्रहण होईल, आणि राज्यावर जे ग्रहण लागलं आहे, हे सुटेल'' असेही राऊत म्हणाले. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com