बदलापुरात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन... 

बदलापुरात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन... 
lockdown news

बदलापूर :  शनिवारपासून बदलापुर Badlapur शहरात कड़क लॉकडाउन Lockdown लागू होणार आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. पालिका प्रशासन, पोलिस Police, सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, आमदार किसन कथोरे Kisan Kathore यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 8 days of severe lockdown in Badlapur 

हे देखील पहा -

अत्यावश्यक सेवेत खाली दररोज नागरिक रस्त्यांवर गर्दी Crowd करत होते. कोरोनाची Corona साखळी तोडण्यात पालिका प्रशासनाला अपयश येत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी सांगितलं आहे. शहरात ८ दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे.

शुक्रवारी Friday नागरिकांनी अत्यावश्यक बाबींची खरेदी करून ठेवावी असे आवाहनही मुख्याधिकारी पुजारी यांनी केले आहे. लॉकडाऊन काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या या लॉकडाऊन काळात शहरातील नागरिकांना अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडता येणार नाही. तसेच  अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानेच या काळात सुरू राहतील. निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com