जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 17 ते 23 नोव्हेंबर

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 17 ते 23 नोव्हेंबर

उतावीळ होऊ नका! 
मेष : गुरुभ्रमणाच्या विशिष्ट स्थितीचा विवेकबुद्धीनं लाभ घ्या. सप्तमस्थ मंगळाच्या आगमनाचं भान ठेवा. उतावीळ होऊ नका. भावनिक शॉर्टसर्किट होऊ देऊ नका! अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींच्या संचितातील ठेवी ता. १९ ते २१ या दिवशी मॅच्युअर होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टाच्या कामात यश. 
============ 
राजकीय उचापती नकोत! 
वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील ग्रहमान सुरवातीला जबरदस्त क्‍लिक होणारं. तरुणांचा भाग्योदय. परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सामाजिक विरोधाला सामोरं जावं लागेल. नका करू राजकीय उचापती! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार स्त्रीचिंतेचा. 
============ 
जनसंपर्कातून मोठे लाभ 
मिथुन : गुरूचं राश्‍यंतर झालंच आहे. आता शुक्राचं राश्‍यंतर गुरूच्या प्रभावात झगमगाट करेल! ता. १९ ते २१ हे दिवस तुमच्या राशीला उत्तम पॅकेजचेच. जनसंपर्कातून मोठे लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीशक्तीचं अर्थातच देव-देवतांचं पाठबळ राहील! पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पगारवाढ. 
============ 
भावनांचं शॉर्टसर्किट नको! 
कर्क : हा सप्ताह मंगळ आणि हर्षल यांच्या ‘स्ट्रॅटेजी’तून ‘फील्ड ऍरेंजमेंट’ करणारा! शारीरिक, मानसिक आणि व्यावहारिक पथ्यं पाळा. सप्ताहात पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींची उलघाल वाढवणार आहे. भावनांचं शॉर्टसर्किट होऊ देऊ नका! रस्त्यावर जपा. नोकरीत बॉसचा अहंकार सांभाळा! 
============ 
शरदाचं चांदणं फुलेल! 
सिंह : सप्ताहातलं शुक्राचं राश्‍यंतर गुरूचं वैभव आणखीच प्रकट करेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी जीवनात येणाऱ्या संधींचा गांभीर्यानं विचार करावा. ता. २० व २१ हे दिवस शरदाचं चांदणं फुलवणारे! प्रेमिकांच्या घट्ट गाठी-भेटी. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार कंटाळवाणा. स्त्रीशी कटकट होण्याची शक्यता. 
============ 
गृहसौख्याचं पर्व सुरू 
कन्या : सप्ताहाच्या प्रारंभी शुक्राचं भ्रमण चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी व्यावसायिक उलाढालींचं. वादग्रस्त येणी येतील. काहींना सेलिब्रिटींचा सहवास. जुन्या गुंतवणुकीतून लाभ. शुक्राच्या राश्यंतरातून उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींच्या गृहसौख्याचं पर्व सुरू होईल. 
============ 
संयमानं, धीरानं वागा 
तूळ : राशीचा मंगळ चित्रा नक्षत्राच्या व्यक्‍तींना शत्रुत्वाच्या पार्श्‍वभूमीवर वा अन्य वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर काही लक्षणं दाखवेल. संयम पाळा. धारीनं वागा. बाकी, सप्ताहातील गुरू-शुक्राची स्थिती कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमांतून तुम्हाला उत्तम साथ देणारी. सप्ताहातील ता. २० व २१ हे दिवस तुमच्या राशीला सर्व प्रकारे शुभलक्षणी. 
============ 
सरकारी कामं फत्ते होतील 
वृश्‍चिक : या सप्ताहात ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शरदाचं चांदणं सुखावून जाईल! विशिष्ट सरकारी कामं फत्ते होतील. घरातील तरुणांचा भाग्योदय होईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० व २१ नोव्हेंबर हे दिवस गुरू-शुक्राच्या पॅकेजमधून उत्तम बजेट घोषित करतील. 
============ 
तरुणांचं नैराश्‍य जाईल 
धनू : सप्ताहात गुरू-शुक्र सहयोगाचा एक उत्तम अध्याय सुरू होईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती ‘टेक्‌ ऑफ’ घेतील. तरुणांचं नैराश्‍य जाईल. उत्तम फ्रेंड-फिलॉसॉफर-गाईड जीवनाच्या प्रवासात भेटतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार प्रवासात बेरंगाचा. पाकीट सांभाळा. 
============ 
सार्वजनिक जीवनात जपून! 
मकर : सप्ताहात नैसर्गिक पाठबळ राहणार नाही. प्रवासाच्या वेळा सांभाळा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना संसर्गजन्य ज्वरपीडा सतावेल. सप्ताहाचा शेवट सार्वजनिक जीवनातून कटकटीचा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा प्रारंभ घरगुती सुवार्तांद्वारे प्रसन्न करणारा. 
============ 
नवी उभारी येईल 
कुंभ : ग्रहांची समीकरणं तुम्हाला उत्तरोत्तर अतिशय चांगल्या प्रकारे फलदायी होतील. सप्ताहातील गुरू-शुक्र सहयोगाचं पॅकेज एक बजेट घोषित करेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नवी उभारी येईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० व २१ हे दिवस वैयक्तिक उपक्रमांतून जबरदस्त क्‍लिक होतील. 
============ 
नोकरीत प्रशंसा होईल 
मीन : रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहाचा प्रारंभ सर्व प्रकारे उत्तम फलदायी होईल. प्रिय व्यक्तींची चिंता जाईल. नोकरीत प्रशंसा होईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ व २२ हे दिवस सुखद धक्का देणाऱ्या सुवार्तांचे. तरुणांचं परदेशगमन. मात्र, हाता-पायाच्या दुखापतींची काळजी घ्या.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com