इच्छाशक्तीच्या जोरावर ८९ वर्षांच्या आजीबाईंनी घरातच उपचार करून केली कोरोनावर मात
grandmother

इच्छाशक्तीच्या जोरावर ८९ वर्षांच्या आजीबाईंनी घरातच उपचार करून केली कोरोनावर मात

धुळे -  जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बळसाने या गावातील 89 वर्षीय आजीबाईंनी Grandmother घरीच उपचार करून कोरोनावर Corona मात केली आहे. कोरोनाची लागण झालेल्या 89 वर्षीय आजींना उपचारासाठी कुठेही बेड Bed शिल्लक नसल्यामुळे नाविलाजास्तव घरातच उपचार करीत आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनाला धोबीपछाड केले आहे. The 89 year old grandmother overcame Corona by treating her at home due to her willpower

इच्छाशक्ती Willpower प्रबळ असली की कोरोना सारख्या राक्षसावर देखील आपण ८९ व्या वर्षात मात करू शकतो. हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बळसाने येथील ८९ वर्षाच्या रियाजवी पटेल यांनी दाखवून दिल आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी आजींना खोकला व ताप येऊ लागल्याने मुलगा अजीम पटेल याने आजींची कोरोना तपासणी करून घेतली. आजीचा सिटीस्कॅनचा रिपोर्ट आल्यानंतर आजींना बारा टक्के एच आर सिटी असल्याचं सिटीस्कॅनच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं.त्यानंतर आजींच्या उपचारासाठी मुलाची रुग्णालय शोधण्यासाठी व बेड मिळवण्यासाठी वणवण सुरू झाली.

बेड कुठेही शिल्लक नसल्यामुळे अखेर अजीमला मोठा प्रश्न पडला आता वयस्कर आईचा उपचार करायचा तरी कसा. या विवंचनेमध्ये असतांना त्याने संपर्कात असलेल्या डॉक्टर निलेश पवार यांना सर्व परिस्थिति सांगितली. त्यानंतर डॉक्टरांनी आजींना घरीच आराम करण्याचा सल्ला दिला. The 89 year old grandmother overcame Corona by treating her at home due to her willpower

अजी साठी घरीच ऑक्सिजनची व्यवस्था देखील करण्यात आली व डॉक्टर निलेश पवार Doctor यांच्या रुग्णालयातून Hospital नर्स डॉक्टर अधून मधून त्यांची तपासणी देखील करत होते.परंतु आजींची इच्छाशक्ती इतकी प्रबळ होती म्हणून आजींनी दहा ते बारा दिवसांतच कोरोना सारख्या राक्षसावर मात केली आहे.

एकीकडे रुग्णालयामध्ये सर्व सुख सुविधा उपलब्ध असताना देखील कोरोनाच्या या संकट काळामध्ये तरुणांचा देखील मृत्यू दर वाढला असताना ८९ वर्षांच्या आजींनी घरीच उपचार करून आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना वर मात केल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांना व तसेच सर्व ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे.त्यामुळे कोरोना झाला म्हणून खचून न जाता आपली जगण्याची इच्छाशक्ती प्रबळ ठेवावी व या इच्छाशक्तीच्या जोरावरच आपण कोरोनावर मात करू शकतो हेच या आजींनी यातून सिद्ध करून दाखविले आहे.

Edited By - Shivani Tichkule
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com