जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 31 डिसेंबर

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 31 डिसेंबर

मेष : कामात अडचणी जाणवतील. बांधकाम क्षेत्रातील व्यक्‍तींना अडचणी जाणवतील. नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. 

वृषभ : ग्रहमान प्रतिकूल आहेच. परंतु, आजचा दिवस समाधानकारक ठरेल. जबाबदारी वाढेल. 

मिथुन : प्रगती वेगाने होणार आहे. विरोधकावर मात कराल. मित्रांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. 

कर्क : कामाचा ताणतणाव राहणार आहे. दगदग राहणार आहे. प्रवासात दक्षता घेण्याची आवश्‍यकता आहे. 

सिंह : ग्रहमान विशेष अनुकूल आहे. तुमची पावले योग्य दिशेने पडत आहेत. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. 

कन्या : फसवणुकीची शक्‍यता आहे. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. 

तूळ : आपल्या राशीला ग्रहमान अनुकूल आहे. आरोग्य चांगले राहील. तुम्हाला योग्य दिशा सापडणार आहे. 

वृश्‍चिक : वैवाहिक सौख्य लाभेल. जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण पडणार आहे. 

धनू : अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. महत्त्वाचे निर्णय नकोत. तुमच्या विचारांचा व मतांचा प्रभाव पडेल. 

मकर : कौटुंबिक सौख्य चांगले राहील. गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. शारीरिक साथ चांगली राहणार नाही. 

कुंभ : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. आरोग्य चांगले राहील. व्यवसायाकडे विशेष लक्ष द्याल. 

मीन : अनावश्‍यक खर्च होणार आहेत. एखादी गोष्ट मनाविरुद्ध होईल. कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य लाभेल. 

पंचांग 31 डिसेंबर 2019 
मंगळवार : पौष शुद्ध 5, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 7.09, सूर्यास्त 6.07, चंद्रोदय सकाळी 10.55, चंद्रास्त रात्री 10.46, भारतीय सौर पौष 10, शके 1941. 

Web Title: Horoscope and Panchang of 31 December 2019
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com