VIDEO | शिवभोजनासाठी अटीशर्थींचा घोळ

VIDEO | शिवभोजनासाठी अटीशर्थींचा घोळ

ठाकरे सरकारने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात दहा रुपयात थाळी या योजनेचा शासन निर्णय जारी झालाय.  तीन महिन्यांसाठी सुमारे 6 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद  या योजनेसाठी करण्यात आलीय. सध्या चालू स्थितीत असलेल्या कोणत्याही खानावळी, हॉटेल्स, आणि स्वयंसेवी संस्थांना ही योजना सुरू करता येणार आहे. 

या जेवणात दोन चपात्या, १ वाटी भाजी, १ वाटी वरण, आणि मोठी वाटी भात मिळणार आहे. एवढं जेवण सध्या कोणत्याही सामान्य खानावळीत पंचवीस ते तीस रुपयांना सहज उपलब्ध असताना सरकार मात्र त्यासाठी तब्बल ४० रुपयांचं अनुदान देणार आहे.  त्यामुळे योजना भुकेल्यांसाठी आही की योजना चालकांच्या अतिरिक्त कमाईसाठी आहे, असा सवाल निर्माण झालाय. 

आणखी एक महत्वाची बाब  १२ कोटींच्या राज्यात दररोज केवळ 18 हजार थाळ्यांचं वाटप करण्यात येणार आहेत. दरदिवसाला वाटप करण्यात येणार आहेत. जिल्हानिहाय सवलतीच्या दरात मिळणाऱ्या थाळ्यांची संख्या निश्चित करण्यात आली असून मुंबई शहर आणि उपनगरसाठी सर्वात जास्त 1950 थाळ्या देण्यात आल्या आहेत. तर सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीला सर्वात कमी म्हणजे 150 थाळ्या देण्यात आल्या आहेत.  ही बाब लक्षात घेता अटीशर्थींमध्ये अडकलेलं हे शिवभोजन किती भुकेल्यांच्या मुखी लागणार हाच खरा प्रश्न आहे. 
 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com