पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे आम आदमी पार्टीचे 'चड्डी बनियन बोंबाबोंब' आंदोलन
Saam Banner Template

पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे आम आदमी पार्टीचे 'चड्डी बनियन बोंबाबोंब' आंदोलन

सांगली: देशातील जनतेमध्ये सरकार विरोधात असंतोष गगनाला भिडला आहे. 35 रुपये लिटर पेट्रोल (Petrol-Diesel) देणार हे दिवास्वप्न दाखवून हे सरकार सत्तेत आले, आणि नोटाबंदी जीएसटी सारखे तुघलकी निर्णय घेऊन संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचे (Economy) कंबरडेच मोडून टाकले. या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ करणाऱ्या भाजप केंद्र सरकारच्या विरोधात आम आदमी पार्टी सांगली यांच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रातील सर्वे पेट्रोल पंपावर चड्डी बनियान घालून जनतेच्या वतीने तीव्र आक्रोश आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल पंप येथे जमलेल्या आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी चड्डी बनियान घालून बोंबाबोंब करून सरकारचा निषेध व्यक्त केला. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीमुळे जनता चड्डीवर आल्याची वेळ आली आहे, असा संताप व्यक्त केला आहे.(The Aam Aadmi Party (AAP) has staged agitation over petrol and diesel price hike)

हे देखील पाहा

दरम्यान, राज्यात सर्व विरोधी पक्ष आता पेट्रोल दरवाढी संदर्भात गंभीर झाले आहेत. पेट्रोलने शंभरी गाठल्यानंतर अनेक लोक आणि राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आंदोलन करण्यतात आले आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त अनेक ठिकाणी ५० रुपयाला एक लिटर पेट्रोल देण्यात येत होते. त्यामुळे आता पेट्रोल दरवाढीमुळे विरोधी पक्ष रस्त्यावर उतरल्याचं दिसत आहे.   

Edited By : Pravin  Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com