आरे दुग्ध वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड अँटी करप्शनच्या जाळ्यात   

आरे दुग्ध वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड अँटी करप्शनच्या जाळ्यात   
bribe

मुंबई - आरे दुग्ध aarey milk वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड  Nathu Rathore अँटी करप्शनच्या Anti-Corruption जाळ्यात अडकले आहे. नथू राठोड यांना ५० हजारांची लाच Bribe घेताना रंगेहाथ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. तक्रारदारास घर दुरुस्ती करण्यास परवानगी हवी होती. Aarey Dairy Chief Executive Officer Nathu Rathore in Anti-Corruption Network

या परवानगीसाठी राठोड यांनी १ लाखाची मागणी केली होती. तडजोड करत अंती ५० हजार रुपये लाच तक्रारदारास देण्यास नथू राठोड यांनी सांगितले. लाच घेण्यासाठी राठोड यांनी लोकसेवक अरविंद तिवारी Arvind Tivari यांना पाठवले होते. 

हे देखील पहा -

तक्रारदारास  लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार लाच घेताना अरविंद तिवारी यांना लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. लुचपत प्रतिबंधक विभागाने तिवारी यांची चौकशी केली असता नथू राठोड यांचे नाव समोर आले. Aarey Dairy Chief Executive Officer Nathu Rathore in Anti-Corruption Network

त्यानंतर राठोड यांच्या घराची झडती घेतली असता. घरात ३ कोटी ४६ लाख १० हजारांची रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अधिक तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com