विनाकारण फिरणाऱ्या २३०२ वाहनांवर कारवाई; तब्बल ७ लाखांचा दंड वसूल

विनाकारण फिरणाऱ्या २३०२ वाहनांवर कारवाई; तब्बल ७ लाखांचा दंड वसूल
Action taken on 2302 vehicles moving in lockdown without any reason

रत्नागिरी:  कोरोना Corona नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन Lockdown सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरून अनावश्यक फिरणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक शाखा Transport sector कारवाई करत आहे. चार दिवसांत दिवसात जिल्ह्यात तब्बल २३०२ वाहनांवर कारवाई करत ७ लाख ८ हजार १०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर २३ वाहने जप्त करण्यात आली आहेत. Action taken on 2302 vehicles moving in lockdown without any reason

रत्नागिरी Ratnagiri जिल्ह्यात ३ जूनपासून ९ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात आला आहे.  कडक कारवाई लॉकडाऊन मध्ये विनाकारण फिरणाऱ्या वाहन Vechiles चालकांवर पोलीस Police करत आहेत. ३ जून रोजी ८०१ वाहनांवर कारवाई करत २ लाख ८७ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला. तर यादिवशी ९ वाहने जप्त करण्यात आली आहेत.  

१ लाख ६८ हजार ६०० रुपये दंड ४ जून रोजी ५०१ वाहनांवर कारवाई करत वसूल केला गेला आहे. ५ वाहने जप्त करण्यात आली आहेत. शनिवारी ५ जून रोजी ४३० वाहनांवर कारवाई करत १ लाख ४९ हजार रूपयांचा दंड वसूल केला असून ६ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

तर रविवारी ६ जून रोजी ५७० वाहनांवर कारवाई करत १ लाख ७५ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला असून ३ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com