अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड 

अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड 
Saam Banner Template (1)

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचे Kangana Ranaut ट्विटर अकाउंट  twitter account सस्पेंड Suspended करण्यात आले आहे. ट्विटरने म्हटले आहे की त्यांनी या व्यासपीठाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. पश्चिम बंगालमधील West Bengal विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर या अभिनेत्रीने काही वादग्रस्त ट्विट केले होते. यासाठी कंगना विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

हे देखल पहा - 

कोलकाता पोलिसांनी पश्चिम बंगालमधील लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल कंगना राणौत विरोधात तक्रार दाखल केली आहे. कोलकात्याचे पोलिस आयुक्त सौमेन मित्रा यांना अ‍ॅडव्होकेट सुमित चौधरी यांनी ईमेलमार्फत तक्रार पाठविली आहे.

आपल्या मेलमध्ये त्यांनी कंगना रनौतच्या ट्विटच्या तीन लिंक्स पाठविल्या आहेत. कंगनाने  बंगालमधील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यांचा अपमान केला आहे, असा आरोप केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com