बुलढाण्यात कोविड सेंटरचे ऑक्सिजन दिले वाऱ्यावर सोडून ! 

बुलढाण्यात कोविड सेंटरचे ऑक्सिजन दिले वाऱ्यावर सोडून ! 
covid centre

बुलढाणा: जिल्ह्यातील ऍक्टिव्ह कोविड Covid रुग्णांचा आकडा ८ हजारांवर गेलेला आहे. तर आतापर्यंत ३९० कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. कोरोना काळात शासनाने अपंग विद्यालय School for Handicapped ताब्यात घेऊन तेथे कोविड रुग्णालय तयार केले आहे. याठिकाणी सध्या जिल्ह्यातील गंभीर असलेल्या रुग्णांवर ऑक्सिजन सह उपचार केले जात आहे. असुविधांकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष असल्याने येथील कार्यरत आरोग्य कर्मचारीही राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. The administrations clear disregard for inconveniences in Covid Center of Buldhana

बुलढाण्याचे Buldhana हे अपंग विद्यालयातील शासकीय कोविड केअर सेंटर आहे. या ठिकाणी सध्या गंभीर असलेले ८५ ते ९० रुग्ण भरती आहे. या सेंटर वर कुठल्याच प्रकारच्या सुविधा नाहीत. तर रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन, औषधींचा तुटवडा येथे नेहमीच असतो.  जे कर्मचारी कोविडच्या रुग्णांची देखभाल करतात त्यांच्यासाठी देखील कोविड प्रतिबंधात्मक साहित्य येथे नाही. फक्त ४ नर्सेचा स्टाफ या पूर्ण ९० रुग्णावर उपचार करीत आहेत. मात्र राज्याचे अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री Minister of Food and Drug Administration ना. डॉ.राजेंद्र शिंगणे Rajendra Shingane यांचे होमटाऊन असलेल्या या जिल्ह्यातील हे कोविड सेंटर सध्या शेवटचा श्वास मोजत असल्याचे दिसून येत आहे.

ऑक्सिजन सेवा फक्त नावाला आहे. मात्र प्रत्यक्षात लागणारे जम्बो सिलेंडर संपले की कोणीही दूसरे सिलेंडर आणून देत नाहीत , त्यांमुळे रुग्ण काही वेळा तड़फडून मृत पावत आहेत. येथे सफाई कर्मचारी नसल्याने घानीचे साम्राज्य असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. ऑक्सीजन वार्डमध्ये उभे रहाणे कठिन झाले आहे. कित्येक वेळा जिल्ह्या शल्य चिकित्सक District Surgeon यांना  याबद्दल कळविले आहे, मात्र साफ दुर्लक्ष केले जात आहे. त्यांमुळे वैतागुन आता राजीनामे देण्याची तयारी  तेथील काम करणाऱ्या स्टाफ नर्स ने बोलून दाखविली आहे.

कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी असल्याने या सेंटरवरचा ताण वाढला आहे. फक्त चार ते पाच  कर्मचारी सर्व काम करू शकत नाहीत, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनाच  ऑक्सिजन सिलेंडर  भरून आणावे लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. The administrations clear disregard for inconveniences in Covid Center of Buldhana

आरोग्य  प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याने येथील कार्यरत आरोग्य कर्मचारीही राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. जिल्ह्याची परिस्थिति प्रशासनाच्या हातातून जाताना दिसत आहे. रुग्णांचे नातेवाईक सुविधा मिळत नसल्याने भांडायला कर्मचार्यांच्या अंगावर जात आहेत. पालकमंत्र्यांनी Guardian Minister या परिस्थितीची दखल घेऊन तात्काळ कर्मचारी आणि आवश्यक सुविधा द्याव्यात आणि रुग्णांना सोयी पुरवून दिलासा द्यावा अशी मागणी कर्मचारी तसेच रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com