अनिल परब नंतर आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर - किरीट सोमय्या

अनिल परब नंतर आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर - किरीट सोमय्या
Saam Banner Template

सोलापूर - सचिन वाझेंसोबत Sachin Waze पाच ऑफिसर निलंबित झाले, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर Anil Deshmukh जेलमध्ये जाण्याची पाळी आली, परमबीर सिंग Param Bir Singh घरी गेले, आता अनिल परबांचा Anil Parabh नंबर लागला आहे आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा Jitendra Awhad नंबर असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी Kirit Somaiya सोलापुरात केला आहे.उद्धव ठाकरे Udhav Thackeray सरकारच्या कोविड करप्शनला भाजपा विरोध करत आहे. After Anil Parab now Jitendra Awhads number  says Kirit Somaiya

हे सरकार पाच वर्ष टिकावं मात्र जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सरकारचे अर्धा डझन मंत्री आणि अर्धा डझन नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम भाजपकडून मी करणारं आहे असं ही सोमय्या यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान,शिवसेना नेते प्रताप सरनाईक हे फरार आहेत, संजय राऊतांना तोडीचे 55 लाख रुपये परत द्यावे लागलेत. मुंबईच्या महापौरांनी एसआरएचे गाळे ढापले आहेत हे हायकोर्टात सिद्ध झालं आहे असं ही सोमय्या यावेळी म्हणाले आहेत.   After Anil Parab now Jitendra Awhads number  says Kirit Somaiya

अनिल परब,अनिल देशमुख यांच्या नंतर जितेंद्र आव्हाड हे आता लाईनीत आहेत. त्यामुळं "आगे आगे देखो होता हैं क्या" असं म्हणत सोमय्यांनी शिवसेना नेत्यांसह आता राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांना ही डिवचलं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा एवढा घमंड करू नये, जालन्यात भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना पाच पोलिसांकडून जी मारहाण झाली ती निंदनीय आहे. त्यातील चार पोलीस निलंबित झाले आहेत. त्याचबरोबर याप्रकरणातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी व्हायला हवी अशी मागणी  किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

हे देखील पहा -

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com