चोरी केल्यानंतर देवीला क्षमा मागणारा चोर अखेर गवसला

चोरी केल्यानंतर देवीला क्षमा मागणारा चोर अखेर गवसला
CCTV video of thieves apologizing to Goddess went viral

भंडारा - पवनीच्या चंडिका माता मंदिरात दानपेटी फोडून चोरी केल्यानंतर देवीला क्षमा मागणारा चोर अखेर गवसला आहे. तेथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साकोलीच्या शिवनीबांध येथून अटक केली आहे. प्रवीण अशोक डेकाटे वय 24 वर्ष असे क्षमा मागणाऱ्या त्या चोराचे नाव असून त्याच्या साथीदार विनोद परिहार वय 39 वर्ष सह त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर देवीला क्षमा मागतांना चोरांचा सीसीटीव्ही व्हिडिओ वायरल झाला आहे. After the theft, the thief who apologized to the goddess was finally found

हे देखील पहा - 

त्या चोरांनी मंदिरात चोरी केल्यानंतर त्यांनी घरफोडी व बाइक चोरी केली होती. भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरातील सुप्रसिद्ध चंडिका माता मंदिरात 8 जूनच्या मध्यरात्री  2 वाजता  चोरांनी प्रवेश केला होता. त्यांनी दानपेटीला लक्ष करत तिला फोडत तेथून पैशाची चोरी केली आहे. टालेबंदी असल्याने तिथे जास्त पैसे नव्हते. पैसे घेऊन पहिला चोर निघाला, मात्र दूसरा चोर तिथेच थांबुन देवीला आपल्या चुकीची क्षमा मागु लागला. 

तो चोर देवीला हात जोडून नमस्कार करत निघुन गेला. चोरीची ही सर्व घटना सीसीटीवी मध्ये कैद झाली होती. त्यानंतर ह्या चोरानी एक घरफोडी करत लॅपटॉप व मोबाइल चोरी केली तसेच एक बाइक देखील चोरी केली होती. ह्याबाबत तपवनी पोलिसांची अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद करत तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुन्हा सुपुर्द करत सीसीटीवी च्या पुरावा दिला होता.  

अखेर लैपटॉपच्या लोकेशन वरुण भंडारा जिल्ह्याच्या साकोलीच्या शिवनीबांध गावात दोन्ही आरोपीना रात्री 11 जूनला अटक केली आहे. आरोपीना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.  सध्या  भंडारा जिल्ह्यातील चंडिका माता मंदिरात चोरी केल्यानंतर देवीला क्षमा मागणाऱ्या आरोपी प्रवीण डेकाटे ह्या चोरांच्या अटकेची चर्चा सुरू आहे. 

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com