विजयाचा गुलाल न उधळता आमदार समाधान अवताडेंनी सुरु केले काम

विजयाचा गुलाल न उधळता आमदार समाधान अवताडेंनी सुरु केले काम
Saam Banner Template

पंढरपूर:  दोन वेळा विधानसभा निवडणुकीत Assembly Elections पराभव झाला. परंतु तिसऱ्या निवडणुकीत विजय मिळाला असतानाही कोरोनाच्या संसर्गामुळे नुतन आमदार MLA समाधान आवताडे Samadhan Avtade यांनी  विजयाचा आनंदोत्सव साजरा न  करता, गुलाल न उधळता, हारतुरे ही न स्विकारता, थेट जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम सुरु केलं आहे. 

पंढरपूर मंगळवेढा Pandharpur Mangalvedha विधानसभा पोट निवडणुकीचा By Election काल निकाल जाहीर झाला. त्यामध्ये  समाधान अवताडे हे विजय झाले. विजयी झाल्यानंतर त्यांनी आपल्या विजयाचा आनंद उत्सव साजरा केला नाही. ऐवढेच नाही तर कुठेही फटाके किंवा जल्लोश देखील केला नाही. निकालाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी शुभेच्छांचे हार तुरे किंवा फेटे न स्विकारता थेट लोकांमध्ये जावून काम सुरु केले आहे.

पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा Corona संसर्ग अधिक आहे. रुग्णांना बेड आणि ऑक्सिजनची  कमतरता आहे. अशा गंभीर परिस्थितीचे भान राखत नुतन आमदार समाधान आवताडे यांनी आज तातडीने पंढपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या दालनात अधिकार्यांची बैठक घेतली. बैठक घेऊन आरोग्य सेवेचा आढावा घेतला. बैठकीत कोरोना लस आणि रेमडेसीवर इंजेक्शन विषयी माहिती घेतली. त्यानंतर अवताडे यांनी सर्व अधिकार्यांना योग्य त्या सूचना देऊन आरोग्य यंत्रणेला अधिक गती दिली. तसेच उजनी धरणातील Ujani Dam पाच Five टीएमसी पाण्यासंदर्भात देखील त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Uddhav Thackrey यांना भेटणार असल्याचे सांगितले.

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com