महागाईच्या विरोधात पंतप्रधान यांना कौल लावण्याचे अनोखे आंदोलन
andolan in sangli

महागाईच्या विरोधात पंतप्रधान यांना कौल लावण्याचे अनोखे आंदोलन

सांगली - मोदी सरकार central government सत्तेवर आल्यानंतर देशात महागाईचा कहर झाला आहे. याच्या निषेधार्थ आज मदनभाऊ युवा मंचतर्फे महागाईच्या विरोधात सांगलीच्या Sangli पेट्रोल पंपासमोर Petrol Pump पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांना कौल लावण्याचे अनोखे आंदोलन केले. agitation against  Prime Minister in sangli

यावेळी भाजप सरकारचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पेट्रोल आणि डिझेल दरवाढ, गॅस दरवाढ असे बोर्ड हातात घेऊन निषेध करण्यात आला. मेरे भाईयो और बहिनो असे म्हणत मोदी सरकार सत्तेवर आले आणि महागाई गगनाला भिडली आहे. जनतेची वाताहत या मोदी सरकारने केली आहे.

हे देखील पहा -

याचा निषेध करण्यासाठी आज मदनभाऊ युवा मंच तर्फे "देवा नरेंद केव्हा आम्हाला पावेंद्र"  हे वाक्य घेऊन आज नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक फोटो ला कौल लावण्यात आला आणि यावेळी नरेंद्र मोदी यांनी महागाई वाढतच राहणार असा कौल दिला असे आंदोलकांनी सांगितले. मोदी सरकार चा निषेध करत हे अनोखे आंदोलन करण्यात आले. 

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com