ओबीसी आरक्षण करिता भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन  

ओबीसी आरक्षण करिता भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन  
Saam Banner Template (37).jpg

धुळे - ओबीसी आरक्षण  OBC reservation रद्द करणाऱ्या सरकार विरोधात भाजपा पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या agitation वतीने आज धुळे महानगरपालिका जवळ असलेल्या गुरू शिष्य स्मारकाजवळ बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आहे.  agitation on behalf of BJP for OBC reservation

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेले ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ आज गुरुवारी रोजी भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. 

भाजप ओबीसी मोर्चाचे उपप्रदेशाध्यक्ष हिरामण आप्पा गवळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. धुळे शहरात गुरू - शिष्य स्मारक परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने सहभागी झाले होते.  agitation on behalf of BJP for OBC reservation

हे देखील पहा -

मराठा समाज व ओबीसी समाज्याच्या आरक्षणावर  सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक गदा आणली असून यामुळे ओबीसी समाज व मराठा समाजावर मोठा अन्याय या सरकारने केला आहे.  असा आरोप भाजप पक्षाच्या आंदोलनकर्त्यांनी लावत महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

Edited By - Shivani Tichkule
 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com