ईंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने आंदोलन; नाना पटोले आंदोलनात सामील  

ईंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने आंदोलन; नाना पटोले आंदोलनात सामील  
petrol pump

गडचिरोली - काँग्रेस  Congress प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांचा राज्यव्यापी जनसंपर्क दौरा सुरू झाला आहे. या दौऱ्यात ते गडचिरोलीत Gadchiroli पोहोचले. नाना पटोले पक्षाच्या इंधन दरवाढ विरोधी आंदोलनात Agitation सामील झाले. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. जिल्ह्याचे संपर्कमंत्री विजय वडेट्टीवार Vijay  Wadettiwar यांची ही आंदोलनात उपस्थिती होती. Agitation on behalf of Congress against fuel price hike

भाजपचे सरकार शेतकऱ्यांकडूनच कर वसूल करत शेतकऱ्यांना फसवत असल्याचा आरोप पटोले यांनी यावेळी केला. मोदी सरकार इंधनावर विविध प्रकारचे कर लादून देशातील जनतेची लूट करत असल्याचा आरोप करत ही लूट थांबविण्यासाठी आता काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. लूट न थांबल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पटोले यांनी दिला.

दरम्यान दुसरीकडे ईंधन दरवाढीच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी भंडारा शहरात मिस्किंन टैंक परिसरात पेट्रोल पंप समोर भंडारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून ह्या वेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली होती. दिवसागणिक  पेट्रोल - डिझेल व गैस छत भावात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 12 महिन्यात ईंधन दरात प्रचंड वाढ झाली आहे. Agitation on behalf of Congress against fuel price hike

हे देखील पहा -

आधीच कोरोनाच्या दोन लाटेत टाळेबंदी लावून सरकारने अनेकांचे रोजगार हिरावुन घेतले असून उलट पक्षी केंद्र शासनाने पेट्रोल ,डिझेलची आणि गॅसची ज्या पद्धतीने दरवाढ केली आहे ही क्रूर थट्टाच असल्याच्या आरोप काँग्रेसने केला असून ह्या सर्वाचा निषेध व्यक्त कराण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले  आहे. काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते फलक घेऊन सहभागी झाले होते. कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कालच गोंदिया येथे ह्या आंदोलनाचे सुतोवत केले होते. यानंतर काँग्रेस द्वारे हे आंदोलन  करण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com