राष्ट्रवादीचे राज्यभरात आंदोलन

 राष्ट्रवादीचे राज्यभरात आंदोलन

मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटिस पाठवण्यात आली. त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर होणार असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांना मुंबईच्या बाहेर वाशी, मुलूंड येथे अडवण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. दुसरीकडे राज्यभरात अनेक शहरांमध्ये राष्ट्रवादीने बंदची हाक दिली असून, तेथे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. 

राज्यात कोठे काय घडले?

  1. शरद पवारांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते मुंबईत दाखल
  2. हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जाळली रस्त्यांवर टायर
  3. कोल्हापूर जिल्ह्यात हुपरी शहरात पवारांवरील कारवाईच्या निषेधार्थ कडकडीत बंद; शहरातील सर्व व्यवहार सकाळपासून बंद
  4. हुपरीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची निदर्शने; ‘सरकार हम से डरती है| ईडी को आगे करती है|’
  5. बुलडाणा संग्रामपुर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर
  6. जालना : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घनसावंगी व परतूर तालुक्यातील कुंभारपिंपळगाव बंद


जळगाव : आज, जळगाव येथे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत दाखल झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत पवारांवरील कारवाईवर भाष्य केले. गेहलोत म्हणाले, ‘आज देशात काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांवर ईडीची कारवाई होत आहे. विरोधकांवर एकापाठोपाठ एक सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीकडून गुन्हे दाखल होत आहेत. भाजपाच्या एकही नेत्यावर छापा किंवा कारवाई नाही. शरद पवार यांना या प्रकरणात गोवण्यात येत आहे. यामागे सुडाची भावना आहे. सत्तेत आल्यापासून राज्यातील विविध नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com