अजित पवारांनी कोणाला भरला सज्जड दम..?

अजित पवारांनी कोणाला भरला सज्जड दम..?
ajit pawar on ram shinde

अहमदनगर : ‘मी आरे ला कारे म्हणणारा माणूस आहे. हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. जर कोणी दम दिला तर त्याला आणि त्याच्या खानदानाला बघतो’अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचा नाव न घेता समाचार घेतला.
अहमदनगरमधील जामखेड तालुक्यात खर्डा येथे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते.

‘आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला कोणी धक्का लावला, तर त्यांच्याकडे बघून घेईन. मी लोकशाही मानणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान मानणारा आहे. मी घटना-कायदा मानणारा आहे. आमचे कार्यकर्ते जर नीट आचारसंहितेचं पालन करत असतील आणि कोण बाहेरचे आणले, तर मलाही जशास तसं उत्तर देता येतं.’असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टीकेचे लक्ष्य केले. निवडणुकीत समोर कोणताच विरोधक नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. मग असं असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहा, गृहमंत्री अमित शाह यांना वीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शंभर सभा का घ्याव्या लागतात? असा सवाल अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केला. आज सर्वसामान्य माणूस पेटून उठला आहे. पण तरुणाईचा उत्साह अभूतपूर्व आहे, असंही अजित पवार म्हणाले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com