उजनीच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय जनआंदोलन शिवसेनेच्या माजी आमदाराचा पुढाकार

उजनीच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय जनआंदोलन शिवसेनेच्या माजी आमदाराचा पुढाकार
Narayan PAtil

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रात पाण्यावरून राजकारण जोर धरत असतानाच उजनी Ujani  धरणाच्या पाण्याचा Water प्रश्न सध्या चांगलाच पेटला आहे. इंदापूर Indapur  ला पाच टीएमसी पाणी देण्याचा ठराव नुकताच मंजूर झाल्यामुळे त्यात नवीन वादाची ठिणगी पडली आहे. त्या अनुषंगाने पुण्यात उजनीच्या पाणी प्रश्नावर घेण्यात आलेल्या बैठकीत मोठा गदारोळ देखील झाला आहे. All-party Movement for Ujani Water Initiative of Former ShivSena MLA 

हे देखील पहा -

सोलापूरला Solapur मिळणाऱ्या उजनी धरणातील पाण्यामध्ये दुजाभाव होत असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे येत्या काळात सोलापूरच्या हक्काच्या उजनीच्या पाणी प्रश्नासाठी जिल्ह्यातील सर्वच पक्षांना All Party एका छताखाली आणून सरकारविरोधात मोठे जनआंदोलन उभे करणार असल्याचे शिवसेनेचे Shivsena माजी आमदार नारायण आबा पाटील Narayan Patil यांनी म्हटले आहे. 

त्यामुळे येत्या काळात उजनीच्या पाणीप्रश्नासाठी  प्रत्येकाने वेगवेगळा लढा न देता सर्वांनी एकत्र येऊन पाण्याची लढाई लढूया असे आवाहन ही यावेळी पाटील यांनी केले. 

Edited By : Krushna Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com