पुणेकरांसाठी गुडन्यूज...शहरात उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार

 पुणेकरांसाठी गुडन्यूज...शहरात उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार
Saam Banner Template (24).jpg

पुणे - कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. यंदा महाराष्ट्रात Maharashtra तर कोरोनाने कहर केला असून उपचारा अभावी अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. मात्र असे असताना गेल्या काही दिवसांपासून दररोज दीड ते दोन हजार पेशंट सापडणाऱ्या पुण्यात Pune आज नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी घाट झाली आहे. All shops in the city will be open from tomorrow from 7 am to 2 pm

पुणे शहरात आटोक्यात येत असलेल्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आणि रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली.  मात्र आता या रुग्ण वाढीतून पुणेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज पुण्यात एकुण रुग्ण १८० रुग्णांची नोंद झाली आहे तर  ७५१ रुग्ण कोरोनामुक्त  झाले आहे. तर ३३ रुग्णांचा मृत्यू  झाला आहे. 

हे देखील पहा -

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा १५ दिवसांचा लॉकडाऊन Lockdown कडक नसला तरी निर्बंध लागू असणार अशी माहिती देण्यात दिली आहे. पुण्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुणे आता अनलाॅककडे जाताना पुण्यात नवे आदेश काढण्यात आले आहे.

पुण्यात टप्प्याटप्प्याने अनलाॅक केले जाईल अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांनी दिली आहे. आता पुण्यात सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते दुपारी २ पर्यंत सर्व प्रकारचे दुकाने उघडी राहणार आहे तर शनिवार व रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहिल अशी देखील माहिती  महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. All shops in the city will be open from tomorrow from 7 am to 2 pm

उद्यापासून पुण्यात काय सुरु राहणार?

1. सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत पुण्यात सर्व प्रकारची दुकाने सुरु.
2. शासकीय कार्यालये 25 टक्के क्षमतेने सुरु  असणार.
3. बार व रेस्टॉरंट हे फक्त पार्सल सेवेसाठी सुरु राहतील.
4. महानगर पालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाच्या सर्व दिवस सुरु राहतील.
5.  महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने सर्व दिवस सकाळी 7 ते २ दुपारी वाजेपर्यंत सुरु राहतील.
6. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे सर्व दिवस सकाळी 7 दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील.
7. ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू  यांची घरपोच सेवा  सुरु करणेस मुभा.

पुण्यात काय बंद असणार?

1. जिम, मंगल कार्यालय, उद्याने, मैदान, पीएमपीएमएल बससेवा बंद राहणार
2. शनिवार आणि रविवार सकाळी 7 ते 2 यावेळेत केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार, अन्य दुकाने बंद असणार.
3. दुपारी 2 नंतर नागरिकांना घराच्या बाहेर पडता येणार नाही.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com