Big Breaking T 20 Mumbai Leage सामने कोरोनामुळे रद्द

Big Breaking T 20 Mumbai Leage सामने कोरोनामुळे रद्द
T 20

मुंबई : राज्यात आणि मुंबईत Mumbai कोरोनाचे Corona रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणारे T20 Mumbai League IPL सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर या निर्णयाचा फेरविचार करण्यात येणार आहे. All  T20 Mumbai League Matches in Mumbai Cancelled due to Corona

खेळापेक्षा जीव वाचवणे आजच्या घडीला अधिक महत्वाचे असल्याचे मुंबई क्रिकेट Cricket असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले.कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीवर ताण पडू न देण्याचा हा आमचा मार्ग असून परिस्थिती सुधारल्यावर निर्णयाचा फेरविचार करू, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील आणि टी २० सामना नियामक समितीचे प्रमुख मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यांनी या संदर्भात पत्रक जारी केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास राज्यात करोनाची तिसरी लाट Third Wave येऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांनी बुधावारी महाराष्ट्रातील करोना परिस्थितीसंदर्भात इशारा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने पुरेश्या प्रमाणामध्ये लसी उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वर्षांमधील व्यक्तींचं लसीकरण Vaccination एक मे पासून सुरु न करता पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केल्यानंतर ही माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या या इशाऱ्यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे. All  T20 Mumbai League Matches in Mumbai Cancelled due to Corona

दुसरीकडे मुंबईमध्ये लसीचा साठा सध्या संपुष्टात आला आहे.अशातच मुंबईतील जवळपास 40 लसीकरण केंद्र आज बंद आहेत. या ठिकाणी लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण आज होणार नाहीये. मात्र या लसीकरण केंद्राच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत. साठा सध्या उपलब्ध आहे तो केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com