पालखी सोहळ्याला किमान दहा वारकऱ्यांना परवानगी द्या, विश्व वारकरी सेनेची मागणी

पालखी सोहळ्याला किमान दहा वारकऱ्यांना परवानगी द्या, विश्व वारकरी सेनेची मागणी
wari

पंढरपूर - आषाढी पायदळ वारी Wari हे वारकऱ्यांचा प्राण आहे आणि गेल्या वर्षापासून कोरोना Corona संकटामुळे पंढरपूर Pandharpur  वारी ,यात्रा बंद आहेत मागील वर्षी वारकर्‍यांनी सरकारला सहकार्य केलं व सरकारच्या आणि प्रशासनाच्या मर्जीप्रमाणे शेकडो वर्षांची परंपरा असणारा पायदळ वारी सोहळा खंडित Fragmented करून प्रातिनिधिक स्वरूपात 9 मानाच्या पालख्या बसने पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या पण आता यावर्षीची परिस्थिती फार वेगळी आहे.  Allow at least ten Warkaris to attend the Palkhi ceremony

विश्व वारकरी सेनेच्या वतीने  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याना पालखी सोहळ्यात किमान पाचशे वारकऱ्यांची मागणी नियम व अटी लावून आपण पूर्ण करावी पण महाराष्ट्रातून विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक प्रांतातील किमान 400 पालख्या पायदल पंढरपुरला येत असतात इतर पालखी सोहळ्याला पायदळ वारी करिता कोरोना संकटाचा विचार करून आम्ही सरकारला आग्रह करणार नाही.

पण त्या पालखी सोहळ्याची वारी खंडित होऊ नये याकरिता आपल्या हद्दीतील तहसील कार्यालया मधून प्रत्येक पालखी सोहळा सोबत कमीत कमी दहा वारकऱ्यांना शासनाचे सर्व नियम व अटी लागू करून वाहनाने पंढरपूर करिता जाण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून शेकडो वर्षाची परंपरा खंडित होणार नाही. Allow at least ten Warkaris to attend the Palkhi ceremony

सरकारने कोरोना काळात पंढरपूर येथे पोट निवडणूक घेतली आणि या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या मीटिंग,हजारो जन समुदायांमध्ये मेळावे घेण्यात आले व आता लॉकडाऊन लागण्याच्या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले पूर्ण महाराष्ट्र मध्य लॉकडाऊन  लागेल पण पंढरपूर येथे मतदान झाल्यानंतर लॉकडाऊन लागेल कारण पंढरपूरची निवडणूक ही अतिशय महत्त्वाचे आहे.

आम्ही सरकारला सांगितले ज्याप्रमाणे आपल्या करिता राजकीय दृष्ट्या निवडणूक अतिशय महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे वारकऱ्यांना सुद्धा आषाढीची वारी अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून वारकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा व पालखी सोहळाच्या संत मंडळींचे अडचणी जाणून घेण्याकरिता पुणे येथे प्रशासकीय मीटिंग घेण्यात येते. Allow at least ten Warkaris to attend the Palkhi ceremony

त्याप्रमाणे इतरही प्रांतातून जाणाऱ्या पालखी सोहळ्या करिता प्रशासकीय मीटिंग घेऊन वारकर्‍यांना पंढरपूर येथे जात असताना कोणत्या समस्या येतात ह्या जाणून घ्या ही विनंती करण्यात येत आहे. आपण वारकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास विश्व वारकरी सेना व इतर वारकरी संघटनांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

हे देखील पहा -

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com