एडेड हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांकडून बुलढाणा जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

एडेड हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांकडून बुलढाणा जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
Buldhana

बुलढाणा : कोरोना Corona महामारीच्या या संकटात कोरोना रुग्णांच्या Patient उपचारासाठी ऑक्सिजन Oxygen ची खूप मोठी गरज निर्माण झाली आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण पहिल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचे महत्व आता जवळपास सर्वांनाच समजले आहे. Alumni Of Aided Highschool Give Oxygen Concentrator To Buldhana District 

बुलढाणा Buldhana जिल्ह्यात देखील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ऑक्सिजन कमी पडत आहेत. हीच गरज लक्षात घेत बुलढाण्यातील एडेड हाईस्कूलचे Aided Highschool माजी विद्यार्थी Alumni जे नोकरी निमित्त घर आणि गाव सोडून बाहेर गावी नोकरी करत आहेत.

हे देखील पहा -

अश्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी व्हॉट्सऍप ग्रुपच्या Whatsapp Group माध्यमातून आपल्या जिल्ह्यासाठी काहीतरी करावे ही भावना मनात ठेऊन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर Oxygen Concentrator देण्याचा संकल्प केला व तीन ऑक्सिजन विकत घेऊन जिल्ह्याधिकारी Collector यांच्या स्वाधीन करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. Alumni Of Aided Highschool Give Oxygen Concentrator To Buldhana District 

कोविडचा काळराक्षस सर्वत्र थैमान घालत असतानाच समाजात घडणाऱ्या काही सकारात्मक घटना एखाद्या जखमेवर हळूवार फुंकर घातल्या सारख्या वाटतात. एडेड हायस्कूल ही बुलडाणा शहरातील तब्बल ९४ वर्षांपूर्वी स्थापन झालेली एक प्रतिष्ठीत शिक्षण संस्था आहे.

आजवर एडेडनं हजारो विद्यार्थी घडवले आहेत. आज आपापल्या क्षेत्रात नावारुपाला आलेले हे विद्यार्थी जगभर विखुरले आहेत. तरीही शालेय जीवनात मिळालेले संस्कार व सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा या विद्यार्थ्यांनी जपला आहे. Alumni Of Aided Highschool Give Oxygen Concentrator To Buldhana District 

जगभर कुठेही असले तरीही बुलडाणा शहराशी जुळलेले ॠणानुबंध जपत कोविडच्या काळात आपण बुलढाणेकर असल्याची जाणीव या विद्यार्थ्यांनी जपली आहे. सगळीकडे निराशेचं वातावरण असताना बुलढाण्यात कोवीड रुग्णांना मदत होईल असे काहीतरी आपण करावे असा विचार एडेडच्या माजी विद्यार्थी समुहात चर्चेला आला.

विचाराअंती सगळीकडे जाणवणारा प्राणवायूचा तुटवडा बघता ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर देण्याचा विचार पुढे आला. आणि मग एडेड हाईस्कूल च्या माजी विद्यार्थ्यांचा व्हॉट्सऍप ग्रुप आहे त्या ग्रुपमधील माजी विद्यार्थ्यांनी पुरेसा निधी अवघ्या चार दिवसात संकलीत केला. Alumni Of Aided Highschool Give Oxygen Concentrator To Buldhana District 

फक्त व्हॉट्सऍपवर केलेल्या एका छोट्याशा आवाहनाला प्रतिसाद देत एडेडच्या माजी विद्यार्थी समुहाने तीन ऑक्सिजन ऑक्सिजन विकत घेतले व ते बुलढाणा परिसरातील गरजू रुग्णांना मदत होईल या हेतूने जिल्हाधिकारी एस रामामुर्ती, बुलढाणा यांच्याकडे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे व सदस्यांनी सुपूर्द केले.

शालेय जीवनातील संस्कार किती महत्वाचे असतात याची प्रचिती या घटनेने  जशी मिळाली तसेच समाजमाध्यमांचा विधायक उपयोग करून किती गोष्टी सहजपणे साध्य होऊ शकतात हेही इथे दिसुन आले आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपसातील ॠणानुबंध जपत समाजॠणाचीही परतफेड करण्याच्या या प्रयत्नातून इतरांनाही प्रेरणा मिळणार आहे. Alumni Of Aided Highschool Give Oxygen Concentrator To Buldhana District 

ऑक्सिजन ऑक्सिजन जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या निमित्ताने बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामुर्ती, धनंजय गोगटे निवासी उपजिल्हाधिकारी, राजेश्वर हांडे उपविभागीय अधिकारी,डॉ.प्रशांत पाटील प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक यांचेसह एडेड हायस्कुल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे, उन्मेष जोशी, मनोज बुरड, आनंद संचेती, अशोक शर्मा, आशिष शर्मा, विनोद राठी,राजेंद्र महाजन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com