अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह
mitali

राज्यात आता कोरोनाच्या  Corona दुसऱ्या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुंगांची संख्या वाढताना दिसून येत आहे. सर्वसामान्य जनता, राजकाणी Politician ते सेलिब्रेटी Celebrity सर्वांना कोरोना संसर्गाने विळखा घातला आहे.  Amit Thackeray wife Mitali Thackeray corona positive

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांचे सुपुत्र अमित ठाकरे   Amit Thackeray यांना कोरोनाची Corona लागण झाली त्यानंतर आता त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे mitali thackeray यांचा  कोरोना अहवाल पॉझिटिव्ह  आला आहे.  सध्या अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात lilavati hospital दाखल करण्यात आले असून  मिताली ठाकरे या होम क्वारंटाइन आहेत.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांच्या पत्नी रश्मी ठाकरे Rashmi Thackeray आणि त्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. Amit Thackeray wife Mitali Thackeray corona positive

दरम्यान, अमित ठाकरे यांच्यावर  रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपचार केले जात आहेत. अमित ठाकरे यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले असून  घरातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी ही खबरदारी घेतली आहे.  

Edited By - Shivani Tichkule

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com