अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

 ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना चित्रपट क्षेत्रात मानाचा समजला जाणारा फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.   दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात आजारी असल्यानं बिग बी उपस्थित राहू शकले नाही, त्यामुळे २९ डिसेंबरला त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती  'माहिती व प्रसारणमंत्री' प्रकाश जावडेकर यांनी दिली. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यांनी राष्ट्रपती भवनात पुरस्कार विजेत्या कलाकारांसाठी  चहापान कार्यक्रमाचं आयोजन केले आहे,  त्यावेळी  बच्चन यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल असंही जावडेकर म्हणाले. सूवर्णकमळ, शाल आणि १० लाख रोख असं पुरस्काराचं स्वरूप आहे. 

Web Title: Amitabh Bachchan will be honoured with Dadasaheb Phalke award on Dec 29

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com