अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या घरावर दगडफेक
An angry mob pelted stones at the house of a man accused of molesting a minor girl

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या घरावर दगडफेक

सांगली : सांगलीत Sangali महिलेच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तिच्या अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी मिरज Miraj शहर पोलिसात फय्याज कोकणे याच्यावर  गुन्हा दाखल केला आहे. तर संतप्त जमावाने आरोपीचा घरावर दगडफेक केल्याची घटना  घडली आहे. तर या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण झाले आहे.. An angry mob pelted stones at the house of a man accused of molesting a minor girl

फय्याज मेहबूब कोकणे (वय 25) राहणार बोकुड चौक. या तरूणाने महिलेच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तिच्या अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी मिरज शहर पोलिसात फय्याज कोकणे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.. मिरज शहर पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी फय्याज कोकणे याला अटक केली आहे. 

मात्र अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार घटनेमुळे तीव्र परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी आरोपीच्या घरावर संतप्त जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे.. घराच्या काचा, आरोपींच्या घराजवळ असलेल्या हातगाड्या जमावाने दगडफेक करून फोडल्या आहेत..  या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घराजवळ धाव घेतली.

हे देखील पहा - 

यावेळी  पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांच्यासह पोलीस फौज फाटा दाखल झाला होता.  परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. यामुळे पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. या झालेल्या घटने नंतर आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली नसल्याची माहिती समोर आली आहे..

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com