धुळ्यात मोकाट जनावरांचा हैदोस वाढला !

धुळ्यात मोकाट जनावरांचा हैदोस वाढला !
animal

धुळे - धुळ्यात Dhule मोकाट जनावरांचा animals हैदोस मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाने Municipal administration याकडे गांभीर्याने Serious लक्ष देत लवकरात लवकर या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी धुळेकरांतर्फे करण्यात येत आहे. animals increased in Dhule the citizens are very tired

धुळे शहरातील मौलवी गंज या परिसरामध्ये या मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणात हैदोस वाढला असून अशाच दोन मोकाट जनावरांमध्ये झालेल्या झुंजीत तब्बल एक तास परिसरातील नागरिक हैरान झाले होते.

हे देखील पहा -

या मोकाट जनावरांना हकलण्यासाठी परिसरातील नागरिकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु ही झुंज सुरू असताना ही मोकाट जनावरे एवढे बेभान झाले होते की त्यांना आवरण्यासाठी नागरिकांची चांगलीच दमछाक उडाली. animals increased in Dhule the citizens are very tired

तब्बल एक तास या मोकाट जनावरांचा चाललेल्या झुंजी मुळे स्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत होती तसेच यामुळे वाहनधारकांची चांगलीच फजिती उडाल्याचे देखील बघायला मिळाले आहे. त्यामध्ये परिसरातील नागरिकांचे बहुतांश नुकसान देखील झाले असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com