राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापन दिन लोकपयोगी कार्यक्रमांनी साजरा
Anniversary Celebration of NCP with public programs

 राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापन दिन लोकपयोगी कार्यक्रमांनी साजरा

परभणी : परभणी Parbhani शहरातील वसमत रोड येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा NCP बावीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे. शहर जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के व माजी खा.सुरेश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. १०.३० ते १२.३० दरम्यान पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,अजितदादा पवार, यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधण्यात आला. Anniversary Celebration of NCP with public programs

त्यानंतर समाजातील गरजू होतकरू नागरिकांना सवलतीच्या दरात ११० पिठाच्या गिरण्याचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोनाचा Corona संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना मृताचे अंत्यविधीचे काम करणाऱ्या व्यक्तींचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

हे देखील पहा - 

कार्यक्रमानंतर रक्तदान शिबिराचे Blood Donation आयोजन करण्यात आले होते. यात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच ज्ञानसाधना प्रतिष्ठान तर्फे ईयत्ता अकरावी व बारावीच्या १०० विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com