T-20 World Cup: तारखा जाहीर करा; ICC चा BCCI ला इशारा

T-20 World Cup: तारखा जाहीर करा; ICC चा BCCI ला इशारा
icc vs bcci.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यावर्षी भारतात आयसीसी टी -20 विश्वचषक (T-20 World Cup) आयोजित करणार आहे. भारतात कोरोनाच्या वाढत्या रुग्णानांमुळे मंडळाने अद्याप आयोजनाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. 29 मे रोजी झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विश्वचषक स्पर्धा होणार आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी 1 जून रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारताला 28 जूनपर्यंत या संदर्भात निर्णय घेण्यास सांगितले आहे.(Announce T20 World Cup dates early; ICC warns BCCI)

आयसीसीने (ICC) मंगळवारी दुबई येथे बोर्डाची बैठक घेतली. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत  भारताला 28 जूनपर्यंत स्पर्धा आयोजित करण्याविषयी माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने असेही म्हटले आहे की 29 मे रोजी एसजीएमनंतर पुढच्या महिन्याच्या अखेरीस याबाबत निर्णय घेण्यात येईल.

हे देखील पाहा

कोरोना साथीच्या काळात भारतात सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाला 29 सामन्यांनंतरच अनिश्चित काळासाठी तहकूब करावे लागले होते. स्पर्धेला स्थगिती देण्याचा निर्णय खेळाडूंच्या बायो बबलमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याने घेण्यात आला होता. आता युएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान पुन्हा आयोजन करण्यासाठी एकमत झाले आहे.(Announce T20 World Cup dates early; ICC warns BCCI)

आयसीसीच्या बैठकीपूर्वी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले होते की ''स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारत ही पहिली पसंती आहे. आम्हाला यासाठी किमान एक महिन्यासाठी आयसीसीकडून थोडा वेळ हवा आहे जेणेकरून यावर निर्णय घेता येईल. जून अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात, जर भारतातील कोरोनाची परिस्थिती चांगली नसेल तर आयोजन युएईमध्ये करण्यात येईल. जर भारतात परिस्थिती चांगली बनली तर आपण ते आयोजित करण्यास सक्षम होऊ''.

Edited By : Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com