बैतुल खामगाव राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अपघात

अपघातात अंजनगाव येथील दोघे ठार
बैतुल खामगाव राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अपघात
बैतुल खामगाव राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अपघातSaam T

अमरावती - जिल्ह्यातील महाराष्ट्र Maharashtra मध्यप्रदेशच्या सीमेला लागून जाणारा बैतुल खामगाव Khamgaon राष्ट्रीय महामार्गावरील पांढरी जवळील वळण रस्त्यावर आज दुपारी दोनच्या सुमारास ट्रक आणि चारचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंजनगाव येथील ओषधी व्यावसायिक प्रमोद निपाणी आणि त्यांच्या सहकारी अंगनवाडी सेवीका ललिता चव्हाण या कामानिमित्त परतवाडाला येत असतांना हा अपघात घडला.

हे देखील पहा -

तर विरूद्ध दिशेने मध्यप्रदेशच्या ग्वालियर येथून येणाऱ्या ट्रकने भरधाव येऊन निपाणे यांच्या गाडीला जोरदार धडक दीली. ही धडक इतकी जोरदार होती की वाहन अक्षरशः ट्रकखाली चिरडले गेले. यामध्ये निपाणी आणि चव्हाण या दोघांचाही मृत्यू झाला आहे. अपघात होताच काहींनी अपघातग्रस्तांना रुग्णालयापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न सार्थक ठरला नाही रुग्णालयात नेत असताना या दोघांचाही मृत्यू झाला.

बैतुल खामगाव राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अपघात
Pune Breaking : कपडे वाळत घालताना तोल गेल्याने आठव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू!

अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रकचालक Truck Driver पसार झाला असून पोलीस Police त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी याप्रसंगी घटनास्थळाचा पंचनामा करत क्रेनद्वारे सदर कार आणि ट्रक बाजूला केली. या मार्गावर मागील दोन आठवड्यांपूर्वी असाच अपघात झाल्याने एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता परिसरातील नागरिकांनी या मार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. अपघाताचा तपास अंजनगाव पोलीस करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com