IPL 2021: KKR ला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिला धक्का
sakib al hasan

IPL 2021: KKR ला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिला धक्का

आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरित हंगामासाठी बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब-अल-हसनला (Shakib Al Hasan) बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र मिळणार नाही असे सांगितले आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष नझमुल हसन याचे कारण देताना म्हणाले '' बांगलादेशचे आगामी दौरे आणि येणार टी-२० विश्वचषक यामुळे बोर्डाने परवानगी नाकारली आहे''.पुढे ते म्हणाले शाकिबला एनओसी न मिळणे जवळजवळ निश्चित झाले आहे. भारतातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आयपीएल सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईमध्ये घेण्यात येणार आहे. (Another player has been dropped from IPL 2021)      

राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान यालाही एनओसी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण कसोटी क्रिकेटसाठी मुस्तफिजूर बांगलादेशचा प्रमुख गोलंदाज आहे. जून- जुलैमध्ये झिम्बाब्वेच्या कसोटी मालिकेनंतर बांगलादेश जुलै- ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलिया बरोबर ५ टी-२० सामने खेळणार आहे. विश्वचषकाच्या अगोदर  ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोघेही बांगलादेश दौरा करणार आहेत.  

 हे देखील पाहा

बांगलादेश क्रिकेट बोर्डचे ऑपरेशन अध्यक्ष म्हणाले '' इंग्लंड मालिका आमच्यासाठी महत्वाची आहे कारण ही मालिका वर्ल्डकप सुपर लीगचा भाग आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंनी एकत्र खेळणे आणि प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे. पुढे ते म्हणले आम्ही सोबत प्रशिक्षण घेऊन इंग्लंड दौऱ्यावर संपूर्ण तयारीनिशी जाणार आहोत. आमच्यासाठी टी-२० विश्वचषक आणि एकदिवसीय मालिका महत्वाची आहे. असेही ते पुढे म्हणाले. दरम्यान, या अगोदर कोलकाता नाईट रायडर्सचा प्रमुख गोलंदाज पॅट कमिंन्स खेळणार नाही असे त्याने स्वतःने सांगितले आहे.   

Edited By : Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com