अँटीबॉडी कॉकटेलने कोरोनाचा खात्मा !

अँटीबॉडी कॉकटेलने कोरोनाचा खात्मा !
vaccinee

सोलापूर - महाराष्ट्रात Maharashtra कोरोना Corona नियंत्रणात येत असल्याच चित्र असले तरी तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच आता कोरोनाच्या गंभीर रुग्णांना बरी करणारी उपचार पद्धती समोर आली आहे. 'अँटीबॉडी कॉकटेल' Antibody cocktail पद्धत महाराष्ट्रात यशस्वी Success झाली आहे.  Antibody cocktail eliminates corona

सोलापुरातील Solapur बार्शीमध्ये 'अँटीबॉडी कॉकटेल'चा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. यामुळे कोरोनाचे गंभीर रुग्ण तात्काळ बरे झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 'मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल' कोरोनावरील या उपचार पद्धतीकडे आता रामबाण उपाय म्हणून पाहिलं जात आहे.

हैद्राबादच्या 'एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोऍड्रोलॉजी' या संस्थेन 40 हून अधिक कोरोना बाधितांवर अँटीबॉडी कॉकटेलचा प्रयोग पाशवी केला आणि पहिल्याच दिवशी बाधितांमधील लक्षण गायब झाली आणि आता सोलापुरात ही हा प्रयोग यशस्वी झाला आहे. सोलापुरातील 4 रुग्ण या उपचार पद्धतीमुळे बरे झाले आहेत.  Antibody cocktail eliminates corona

विशेष म्हणजे आता महाराष्ट्रात ही 'अँटीबॉडी कॉकटेल'चा प्रयोग यशस्वी झाला आहे. सोलापुरातल्या बार्शीतील डॉ.संजय अंधारे यांनी 4 कोरोनाबाधितांना 'अँटीबॉडी कॉकटेल'च्या डोसने बरं केल आहे. या चार रुग्णांमध्ये कारमाळ्यातील एका डॉक्टरांच्या 65 वर्षीय आईचा आणि बार्शीतल्या एका वकिलाच्या वडिलांचा समावेश होता.'अँटीबॉडी कॉकटेल'च्या डोस नंतर त्यांना दुसऱ्या दिवशी घरी पाठवण्यात आलं.

हे देखील पहा -

विशेष म्हणजे 60 वर्षावरील रक्तदाब,मधुमेह आणि दमा असलेले रुग्ण अँटीबॉडी कॉकटेलमुळे बरे झाले आहेत.सध्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे त्यात 'अँटीबॉडी कॉकटेल' उपचार पद्धती प्रभावी ठरत असल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com