डोंबिवली MIDC निवासी भागातील रस्त्यांसाठी 110 कोटींचा निधी मंजूर

डोंबिवली MIDC निवासी भागातील रस्त्यांसाठी 110 कोटींचा निधी मंजूर
shivsena

एमआयडीसी औद्योगिक भागासह निवासी भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या 20 वर्षांपासून निवासी भागातील या रस्त्यांची देखभाल न झाल्याने या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. अनेकदा या रस्त्याच्या कामासाठी निधीच्या घोषणा झाल्या अद्यापही रस्त्याचे काम सुरू झालेले नव्हते. (Approved funding for roads in the midc area of Dombivli)

अखेर या रस्त्याच्या कामासाठी 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत आज खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी कल्याण-डोंबिवली करिता घोषित केलेल्या 6500 कोटीचा प्रश्न केला असता त्यांनी नाव न घेता भाजपला टोला मारला आहे. खा.शिंदे यांनी सांगितले की याच्यामध्ये ज्यांनी घोषणा केली त्यांनी याचा विचार केला पाहिजे. आम्ही फक्त घोषणाबाजी करत नाही,शिवसेना पक्ष आधी काम करतो आणि मगच सांगतो.

हे देखील पाहा

तत्पूर्वी एमआयडीसी औद्योगिक भागासह निवासी भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेकदा या रस्त्याच्या कामासाठी निधीच्या घोषणा झाल्या अद्यापही रस्त्याचे काम सुरू झालेले नव्हतं. अखेर या रस्त्याच्या कामासाठी 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.याबाबत आज खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. तसेच या भागातील रस्ते दुरुस्ती एमआयडीसी करणार की केडीएमसी याबाबत निर्णय होत नव्हता.

मात्र आता हा पेच सुटला असून 50 टक्के खर्च एमआयडीसी आणि 50 टक्के केडीएमसी करणार आहे. प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होण्यास महिनाभराचा कालावधी लागणार असून या दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निवासी भागातील या रस्त्यांची डागडुजी केडीएमसी कडून करण्यात येणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. 

Edited By : Pravin Dhamale
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com