बाईक प्रेमीं आहात? मग ही बातमी वाचाच  

बाईक प्रेमीं आहात? मग ही बातमी वाचाच  
Yamaha FZ 25.jpg

वृत्तसंस्था  : तुम्ही बाईक प्रेमीं असाल आणि जे आता नवीन बाईक (New Bike)घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्या साठीच आहे. विशेष म्हणजे तुम्हाला जर यामाहाच्या (Yamaha) बाईक्स आवडत असतील तर तुम्ही ही बातमी एकदा वाचलीच पाहिजे, यांचे कारण म्हणजे यामाहा कंपनीने त्यांच्या दोन बाईक्सची  म्हणजेच Yamaha FZ25 आणि Yamaha FZS25 ची किंमत 19000 हजार रुपयांनी कमी केली आहे. या बाईक्स बनवण्यासाठी लागणारा खर्च कमी केल्यामुळे या दोन्ही बाईक्सच्या किमती कमी  करण्यात आला आहे.  त्यामुळे आता  ग्राहकांनाही याचा फायदा होणार आहे.  (Are you a bike lover? Then read this news) 

Yamaha FZ 25 आणि Yamaha FZS25 ची किंमत कमी करण्यामागे कंपनीने स्पष्टीकरणही दिले आहे. यापूर्वी  Yamaha FZ 25ची आधीची एक्स शोरूम किंमत 1,53,600 होती,  याची किंमत 18,800 रुपयांनी कमी केल्यानंतर आता Yamaha FZ 25 ची एक्स शोरूम किंमत 1,34,800 रुपये इतकी झाली आहे. तर Yamaha FZS 25 ची किंमत 1,58,60 रुपये होती. ही बाईक 19,300 रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यानंतर आता  FZS 25 ची एक्स शोरूम किंमत 1,39,300 रुपये इतकी  झाली आहे.  तर वजन 154 किलो आहे.  बाईक्सच्या किंमती कमी केल्या असल्या तरी त्यांचे स्पेसिफिकेशन आणि  वैशिष्ट्य यांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.  असे कंपनीने म्हटले आहे. 

यामाहा कंपनीने FZ 25 नवीन बाईकमध्ये BS6 बाईकच्या लूकमध्येही बदल  करण्या बरोबरच बाईक्सच इंजिनही अपग्रेड केलं आहे.  यामाहाच्या या दोन्ही बाईक्समध्ये फ्यूअल-इंजेक्शन टेक्नॉलॉजीसह  एअर कूल्ड इंजिन, सिंगल सिलेंडर, आणि  बीएस 6 कम्प्लायंट 250ccआहे. हे इंजिन 6,000rpm वर 20.1Nm आणि  8000 rpm वर 20.8PS पावर आणि टॉर्क जनरेट करते. तसेच या बाईकमध्ये 5 स्पीड गियरबॉक्स सह  FZ 25मध्ये LED हेडलाइट्स, इंजन काऊल आणि निगेटिव्ह LCD डिस्प्ले आणि  साइड स्टॅण्ड इंजिन कट ऑफ दिला आहे.  याशिवाय बाइक्सच्या दोन्ही साईडला ड्युअल चॅनल एबीएस  डिस्क ब्रेकही दिले आहेत. तर FZS25 मध्ये हँडल ग्रिप्सवर ब्रश गार्ड्स आणि गोल्ड अलॉय व्हिल्स, विझर, लाँग वायझर देखील आहेत.  

Edited By - Anuradha Dhawade 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com