बेकायदेशीर मांडूळ साप बाळगल्याप्रकरणी दोघे ताब्यात
snake

बेकायदेशीर मांडूळ साप बाळगल्याप्रकरणी दोघे ताब्यात

सांगली -  सांगलीच्या Sangli स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि तासगाव वनविभाग यांनी तासगाव Tasgaon तालुक्यातील धुळगाव Dhulgaon येथे छापा टाकून बेकायदेशिर मांडूळ Snake बाळगल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. तनवीर रहामन कामिरकर आणि फिरोज सलीम मुजावर अशी ताब्यात घेतलेल्या संशयीतांची नावे आहेत. arrested 2 people for illegal possession of snake

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड Sarjerao Gaikwad यांनी आरोपींचा शोध घेणे आणि अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत खास पथक तयार केले आहे. या पथकामार्फत तासगाव विभागातील फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पेट्रोलींग सुरू होते.

हे देखील पहा -

तेव्हा तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुळगाव येथे फिरोज मुजावर याच्या शेतातील शेडमध्ये निळ्या रंगाच्या बॅरेल मध्ये मांडूळ जातीचा दुर्मीळ साप अवैधपणे बाळगला असल्याची माहिती पोलिसांना  मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि तासगाव वनविभाग अधिकारी यांच्या संयुक्त पथकामार्फत फिरोज मुजावर याच्या शेतात शेडमध्ये छापा टाकला. तिथे तनवीर कामिरकर  आणि फिरोज मुजावर हे दोघेजण अढळले. arrested 2 people for illegal possession of snake

तेथील शेडमध्ये निळ्या रंगाच्या बॅरेल मध्ये मांडूळ जातीचा दुर्मिळ साप सापडला. पंचनामा करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.  तनवीर कामिरकर आणि फिरोज मुजावर अशी ताब्यात घेतलेल्या संशयीतांची नावे आहेत  पुढील तपास तासगाव वनविभाग अधिकारी करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com