अटक पोलिस अधिकारी सुनील मानेचा मनसुख हत्येतही सहभाग?
Sunil Mane - Mansukh Hiren

अटक पोलिस अधिकारी सुनील मानेचा मनसुख हत्येतही सहभाग?

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणात Antilia Bomb Case अटक करण्यात आलेला मुंबईचे पोलिस अधिकारी सुनील माने याला न्यायालयाने २८ एप्रीलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. मनसुख हिरेन हत्येच्या गुन्हातही माने याचा सहभाग असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले आहे. दरम्यान, सचिन वाझे आणि रियाज काझी यांची न्यायालयीन कोठडी ५मे पर्यंत वाढवली आहे. Arrested Mumbai Police officer Sunil Mane Remanded to NIA Custody

अँटिलिया स्फोटक प्रकरणात एनआयए NIAने पोलिस अधिकारी सुनिल मानेला अटक केली आहे. सुनिल माने, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे Sachin Waze यांच्यात ३ फेब्रुवारीला मिटिंग झाल्याचं सांगितलं जात आहे. माने यांनी या प्रकरणात मनसुख हिरेनवर Mansukh Hiren गुन्हा कबूल करण्यासाठीही दबाव टाकल्याची माहिती आहे.सुनिल माने हे सध्या सशस्ञ पोलिस दलात Mumbai Police कार्यरत होते. मात्र, माने हा  गुन्हे शाखेत प्रभारी म्हणून कार्यरत असताना, त्या काळात वारंवार वाझे यांना भेटायलाही यायचा, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

सुनिल माने याला दुपारी २ च्या सुमारास NIA स्पेशल कोर्टात आणण्यात  आले.माने पहिल्या दिवसापासून सहकार्य करत असताना एनआयएने पहाटे माने याला अटक केली. हे कायद्याने चुकीचे आहे, त्यांना तातडीने जामीन मिळावा, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली. ४८ तासांच्या चौकशीनंतर अटक करणं चुकीचं आहे, मानेचा या गुन्ह्यात रोलही नाही, फक्त तांञिक पुराव्यांच्या आधारावर ही अटक करण्यात आली असल्याचा युक्तीवाद मानेच्या वकिलांनी केला.Arrested Mumbai Police officer Sunil Mane Remanded to NIA Custody

त्यावर मनसुखच्या हत्येच्या गुन्ह्यात मानेचा स्पष्ठ सहभाग असल्याचे  ATS तपासात समोर आले आहे. त्याच बरोबर काही तांञिक पुरावेही माने विरोधात आढळून आल्यानेच ही अटकेची कारवाई केली असल्याचे NIA कडून सांगण्यात आले. माने मनसुखच्या हत्येवेळी घटनास्थळी दाखल असल्याची एनआयएने न्यायालयात दिली. मनसुख हिरानींना त्यांच्या हत्येच्या दिवशी फोन करणारा सचिन वाझे नसून सुनिल माने याने फोन करून मनसुखला हत्येच्या दिवशी बोलावले होते, असेही  एनआयच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com