बुलढाण्यात 2 हजार आशा वर्कर्स बेमुदत संपावर...

बुलढाण्यात 2 हजार आशा वर्कर्स बेमुदत संपावर...
asha worker

बुलढाणा - कोरोना Corona महामारिच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्रामीण भागात कोरोना योद्धा म्हणुन कार्य केले.त्यामुळेच ग्रामीण भागातील कोरोनाबाधिताना योग्य तो उपचार मिळाला अन्यथा जिल्ह्या आरोग्य विभागाची Health Department  यंत्रणा कुचकामी ठरलेली होती मात्र आशा वर्कर्सनी Asha worker यंत्रणा जागृत ठेऊन मोलाचे कार्य केले अश्या आशा वर्कर्सला कोरोना महागयी भत्ता व शासकीय वेतन देण्याची मागणी सीटू संघटनेने situ organization केली आहे. Asha workers on strike in buldhana

मात्र शासनाने दुर्लक्ष केल्याने आशा वर्कर्स संघटनेने आज पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यानुसार आजपासून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ठप्प पडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रनेची भिस्त सर्व आशावर्कर्स वर आहे. कोरोनाबाधित टेस्टिंग करने, त्या रुग्णांना भर्ती करुण देने, त्यांच्यावर योग्य उपचार होतो की नाही यावर लक्ष ठेवणे अश्या असंख्य जोखिमेची कामे आशावर्कर्स कडून करुण घेण्यात आली.

हे देखील पहा -

जेव्हा त्यांना कोरोना भत्ता देण्याची वेळ आली तेव्हा सरकारने नाकारले म्हणजे काम सरो वैद्य मरो या म्हनीप्रमाने सरकारने वागणूक दिली आहे. त्यांमुळे सरकारचा निषेध नोंदवित तात्काळ मागण्या  मंजूर करा अन्यथा या महामारिच्या काळात उद्भवणाऱ्या संकटाला  सरकार  जबाबदार राहिल अशी घोषणा सीटू संघटनेने केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com