कोरोनाविषयक जनजागृती करणाऱ्या आरोग्य पथकावर गावगुंडांचा हल्ला

Attack on health team raising corona awareness in Palghar
Attack on health team raising corona awareness in Palghar

पालघर :  कोरोनाविषयक Corona जनजागृती करणाऱ्या दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नऊ जणांच्या आरोग्यपथकावर गावगुंडांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात या गुंडांनी, डॉक्टर यांच्यासह आरोग्य सेवक-सेविका, गट प्रवर्तक, समुदाय आरोग्य अधिकारी व वाहनचालक यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार मनोर पोलीस Police ठाणे हद्दीत घडला आहे. Attack on health team raising corona awareness in Palghar

या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर गावकरी पोलिसांवर हल्ला चढविण्याच्या तयारीत होते. मात्र पोलीस बळ कमी असल्याने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी प्रसंगावधान राखत तेथून काढता पाय घेतला. यामुळे मंगळवारी गडचिंचले प्रकरणााची पुनरावृत्ती टळली.

 हे देखील पहा - 

या घटनेनंतर आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी निषेध केला. जिल्हाभर काळया फिती लावून काम केले. जर इतर आरोपींना अटक केली नाही तर कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मनोर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यार घेतले आहे. तर या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com